कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना आदरांजली अर्पण

    28-Jul-2021
Total Views |
 
 

kargil_1  H x W 
 
कारगिल विजय दिनानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.कारगिल विजय दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले.दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी युद्ध स्मारकातील कार्यक्रमात पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना आदरांजली अर्पण केली. मेजर जनरल (निवृत्त) हु्नकर ए. के. यांनीही पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. या वेळी लष्कराचे आजी-माजी अधिकारी, जवान व त्यांचे कुटुंबीय उपस्थित हाेते. कारगिल युद्धात सहभागी असलेले जवान व अधिकारी हे खरे प्रेरणास्राेत आहेत. शहीद जवानांनाही देश कधी विसरणार नाही, अशा शब्दांत ले.ज. नैन यांनी शहिदांना आदरांजली वाहिली. काेराेना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.