पन्नास खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक

    24-Jul-2021
Total Views |
 
देशमुख यांची माहिती : शाळा सुरू करण्याचा विचार
 

school_1  H x W 
 
गेल्या दीड वर्षांपासून आपण काेराेनाशी मुकाबला करत आहाेत. अजूनही काेराेनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता निर्माण हाेत आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या काळात 50 खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.येथे एका ऑनलाइन सेमिनारमध्ये देशमुख बाेलत हाेते. काेराेना रुग्णांची संख्या आटाेक्यात येत असली, तरी रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते. त्यामुळे रुग्णालयांनी स्वत: ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.राज्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आल्या. मात्र, आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदाला आणण्याचा प्रयत्न हाेत असताना शाळा-महाविद्यालये सुरु करण्यात महाराष्ट्र आघाडी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.