अमेरिकेतील प्रयाेग यशस्वी; ‘स्पीच न्यूराेप्राेथेसिस’मुळे मेंदूतील शब्द उमटतील स्क्रीनवर
अर्धांगवायूचा (पॅरेलिसीस) झटका आलेल्या रुग्णांनाही लवकरच त्यांच्या विचारांनुसार ‘बाेलणे’ श्नय हाेईल. अशा रुग्णाच्या मेंदूतील संदेश त्याच्या स्वरयंत्रापर्यंत पाेहाेचून ते समाेरच्या स्क्रीनवर टे्नस्टच्या स्वरूपात दिसतील.अमेरिकेतील संशाेधकांनी ‘स्पीच न्यूराेप्राेथेसिस’ ही प्रणाली तयार केली असून, अर्धांगवायूचा तीव्र झटका आलेल्या रुग्णांनाही त्याद्वारे ‘बाेलणे’ श्नय हाेणार आहे.
कॅलिफाेर्निया-सॅन फ्रान्सिस्काे विद्यापीठाने तयार केलेल्या या प्रणालीत मेंदूतील शब्द डिकाेड करण्याची आणि त्यात 93 टक्के अचूकतेची क्षमता आहे. दर मिनिटाला 18 शब्द या प्रणालीद्वारे वापरता येतात.अर्धांगवायूचा गंभीर झटका आलेल्या एका व्यक्तीवर याबाबतचा प्रयाेग यशस्वी झाला आहे. ही व्यक्ती तीस वर्षांची असताना, म्हणजे 15 वर्षांपूर्वी तिला ‘ब्रेन स्टेम स्ट्राेक’चा झटका येऊन या व्यक्तीच्या मेंदू आणि स्वरयंत्राचा संपर्क तुटला. तेव्हापासून या व्यक्तीच्या मान, मस्तक आणि शरीराच्या हालचाली अगदी मर्यादित झाल्या हाेत्या.विद्यापीठाच्या संशाेधकांनी या रुग्णाच्या ‘स्पीच माेटाेर काेर्टे्नस’मध्ये उच्च क्षमतेचा इलेक्रोड बसविला आणि त्याच्या मेंदूतील घडामाेडींची माहिती 22 तासांपर्यंत घेतली.
काही महिने आणि 48 सेशन्स हे चालू हाेते. रुग्णाच्या मेंदूतील विचार इले्नट्राेडमध्ये नाेंदविले जात हाेते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने त्याचे शब्दांमध्ये रूपांतर हाेत हाेते. त्यातून संशाेधकांच्या पथकाने दैनंदिन वापरातील पन्नास शब्दांचा संग्रह तयार केला. त्यात पाणी, कुटुंब आणि छानसारख्या शब्दांचा समावेश हाेता.काॅम्प्युटरच्या आधुनिक अल्गाेरिदमच्या मदतीमुळे हे शब्द समजणे साेपे गेले. ‘अर्धांगवायू झालेल्या रुग्णाच्या मेंदूतील घडामाेडींचे डिकाेडिंग करता येण्याचा हा पहिला यशस्वी प्रयाेग असावा.’ अशी माहिती प्राध्यापक आणि न्यूराेसर्जन एडवर्ड चँग यांनी दिली. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मध्ये या प्रयाेगाची माहिती त्यांनी प्रसिद्ध केली आहे. संशाेधकांनी तयार केलेल्या पन्नास शब्दांच्या संग्रहातून रुग्णासाठी एक साेपे वा्नय तयार करण्यात आले आणि त्याने ते उच्चारण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले गेले. त्याने तसे करताच, त्याच्या मेंदूतील हे शब्द डिकाेड हाेऊन स्क्रीनवर एकामागाेमाग एक असे उमटत गेल्याचे एडवर्ड चँग यांनी सांगितले.