उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात सुषमा आणि कांती करत असलेले अनाेखे कार्य
अग्नये स्वाहा! अग्नेय इदं न मम...आता मृतदेहावर तूप लावून म्हणा - ‘प्रेताय इदं न मम’ हे मंत्र प्रत्येक हिंदू स्मशानभूमीत पुरुष पुराेहितांच्या ताेंडून ऐकायला मिळतात; परंतु उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील अचलगंज येथील बलाई घाट या स्मशानभूमीत हे मंत्र महिलांच्या ताेंडून ऐकायला मिळतात.या घाटावर सुषमा आणि कांती नावाच्या महिला म्हणजे स्मशानात आलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे काम करतात. दाेघींच्याही पतीचे निधन झाल्यानंतर या दाेघींनी पतींचे हे काम स्वीकारले.दरमहा करतात 15-20 अंत्यसंस्कार सुषमा व कांतीचे याशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. त्या भूमिहीन आहेत. सुषमा एका महिन्यात 15-20 अंत्यसंस्कार करते. एका अंत्यसंस्काराचे तिला 700 ते 1000 रु. मिळतात. गंगास्नान करणारे वेगळी दक्षिणा देतात.
या दाेघींनाही विधवा पेन्शन किंवा आवास याेजनेचा लाभ मिळालेला नाही. अचलगंजपासून अंदाजे 8 कि.मी. दूर बलाई घाट स्मशानभूमी आहे. सुषमा या घाटावर अंत्यसंस्कार करण्याचे काम करते. एक दिवसही ती सुट्टी घेत नाही. हड्डा गावाच्या सुषमाचा पती संताेष याच घाटावर अंत्यसंस्कार करण्याचे काम करीत असे. 12 वर्षांपूर्वी संताेषचा मृत्यू झाला. सुषमासमाेर दाेनच पर्याय हाेते. मजुरी करावी किंवा पतीचे काम पुढे चालवावे लाेकांनी तिला भीती दाखविली, प्रेते पाहून तुला भीती वाटेल, अशी समजूत घातली, समाज काय म्हणेल? असेही म्हणाले; पण सुषमाने स्मशानघाट स्वीकारला आता ती 24 गावातून येणाऱ्या प्रेतांवर अंत्यसंस्कार करते तिला दरराेज घाटावर यावेच लागते.सुषमाचे डाेळे भरून येतात...स्मशान घाटावर येईपर्यंत मृतकांच्या नातेवाईकांच्या डाेळ्यांचेही पाणी सुकते.
सुषमा तर राेजच प्रेतावर अग्निसंस्कार करते; पण ज्यावेळी एखाद्या लहान मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना सुषमाचेही डाेळे भरून येतात.कांतीचीही स्थिती अशीच हाेते. कारण दाेघीचेही मातृहृदय आहे. त्यांची ममता त्यांच्या डाेळ्यातून झिरपते.दिवंगत मुलांच्या कुटुंबीयाकडून पैसे घेताना त्यांना बराेबर वाटत नाही; पण करणार काय? पापी पेट का सवाल है.कांती पंडा सुमारे 20 वर्षांपूर्वी अचलगंजमध्ये विवाह हाेऊन आली हाेती; परंतु गेल्या 10 वर्षांपासून इदं न मम हा मंत्र तिच्या आयुष्याचा आधार बनला आहे.पतीचे निधन झाल्यानंतर आता कांती स्मशान घाटावर डाेम बनून मृतांवर अंत्यसंस्कार करते. अंत्यसंस्कारवरच या कुटुंबाची उपजीविका चालते.तिच्या मुलीचा विवाह झाला आहे आणि मुलगा नीरज कानपूर येथे नाेकरी करताे.