बेड रिडन रुग्णांसाठी लसीकरणाची सुविधा

    21-Jul-2021
Total Views |
 
 
vaccination_1  
 
 
अंथरुणाला खिळून असणाऱ्या राज्यभरातील रुग्णांना व वयाेवृद्ध नागरिकांना काेराेना लसीकरणाची विशेष सुविधा आराेग्य विभागाने उपलब्ध करून दिली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाइन नाेंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे. अंथरुणाला खिळून असलेले रुग्ण व वयाेवृद्धांना घरी जाऊन आराेग्य पथकाने लस द्यावी, यासाठी उच्च न्यायालय आग्रही हाेते.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ज्या व्यक्ती अंथरुणाला खिळून आहेत व पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल, अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे. अशा व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि ही व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डाॅक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आदी माहिती covidvaccsbedriddengmail.com यावर पाठविण्याचे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.