उत्तर अॅटलांटिक महासागरात एक वेगळाच समुद्र आहे, ज्याचे नाव आहे ‘सरगासाे’.सरगासाेच्या पाण्याचा रंग गडद निळा आहे. हे पाणी एवढे स्वच्छ व नितळ आहे की, इतर समुद्रांपेक्षा या समुद्रात मासे, कासव व इतर सागरी प्राणी व्यवस्थित दिसतात व हे प्राणीही पाण्यातून दूरवर पाहू शकतात.महासागराच्या कुशीत असलेल्या या समुद्राचे वैशिष्ट्य म्हणजे याला किनारा नाही. याच्या पृष्ठभागावर नेहमी सागरी शेवाळ तरंगत असते व त्यावरूनच या समुद्राची सीमा ठरवली जाते.हा समुद्र सर्वप्रथम पाेर्तुगालच्या नाविकांनी ओलांडला.