जगभरात प्रजाेत्पादनाचा दर (फर्टिलिटी रेट) घसरत चालला आहे. यात विराेधाभास म्हणजे काही देशांची लाेकसंख्या प्रचंड आहे, तर काहींची कमी हाेत चालली असून, ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढते आहे. एका अंदाजानुसार, 2064 पर्यंत लाेकसंख्या शिगेला पाेहाेचेल आणि नंतर ती घटत जाऊन या शतकाच्या अखेर 880 काेटींवर येईल.
संध्यानंद.काॅम
काेणत्याही देशाच्या विकासात लाेकसंख्या हा कळीचा मुद्दा असताे. प्रचंड लाेकसंख्या असेल, तर विकासात अडथळे येतात आणि अगदी कमी असेल, तरी समस्या येतात. लाेकसंख्येत कामकरीवर्गाचे प्रमाण किती यावर प्रगती ठरते.जगात सध्या प्रजाेत्पादनाचा दर घटत असून, ‘द लॅन्सेट’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या ‘फर्टिलिटी, माॅर्टिलिटी, मायग्रेशन अँड पाॅप्युलेशन सिनेरिओ’ या अहवालानुसार, 1950 मध्ये फर्टिलिटी रेट 4.7 हाेता. 2004 मध्ये ताे 2.4 वर आला. 2100 मध्ये ताे 1.7 वर असेल.त्यामुळे 2064 मध्ये जगाची लाेकसंख्या शिगेला पाेहाेचून ती 970 काेटींवर जाईल. नंतर ती घटायला लागून या शतकाअखेर ती 880 काेटींवर असेल, असा अंदाज आहे. असे झाले, तर जपान, स्पेन, पाेर्तुगाल, थायलंड आणि दक्षिण काेरियासह 23 देशांची लाेकसंख्या निम्म्यावर येईल.
हाँगकाँगमधील रिचलँड गार्डन हा जगातील सर्वांत सधन भाग मानला जाताे. 2003 नंतर 2021 मध्ये प्रथमच या भागातील लाेकसंख्या घटली आहे.कमी लाेकसंख्येशी झुंजणारे देश
चीन : या देशाचा फर्टिलिटी रेट 1.5 वर आला आहे. 100 मुलींमागे 117 मुलगे असे प्रमाण असल्याने संतुलन टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.चीनचा ग्राेथ रेट सध्या 0.53 वर आला असून, एक मूल हे धाेरण 2016 मध्येच बंद करण्यात आले आहे. दाेन मुले हाेऊ द्या, असे सरकार सांगत असूनही काही उपयाेग हाेत नसताना आता तीन मुले हाेऊ द्या, असे सांगितले जात आहे.
अमेरिका : गेल्या दशकातील लाेकसंख्या वाढीचा वेग 1920 नंतरचा सर्वांत कमी हाेता. 2020 च्या जनगणेनुसार ग्राेथ रेट 3.5 टक्के आहे. पान : नव्या शतकाच्या प्रारंभी जपानची लाेकसंख्या 12.8 काेटींनी घटून शतकाअखेर 5.3 काेटी राहण्याचा अंदाज आहे.
इटली : या देशाची लाेकसंख्या 6.1 काेटी असून, ती 2.8 काेटींवर येण्याचा अंदाज आहे. युराेपात सर्वांत कमी फर्टिलिटी रेट इटलीचा असून, ताे 1.3 आहे. येथे मुलाच्या जन्मानंतर 800 युराेंचा प्राेत्साहन भत्ता दिला जाताे.
रशिया : लाेकसंख्या वाढीचे प्रयत्न सतत सुरू आहेत. 1999 मध्ये येथील फर्टिलिटी रेट 1.99 वर आला हाेता. सध्या ताे 1.48 वर पाेहाेचला आहे. हे देश कमी लाेकसंख्येच्या समस्येबराेबर सामना करत असताना आफ्रिकेतील नायजेरिया या देशातील फर्टिलिटी रेट मात्र 6.9 च्या वर आहे.