घरातील शांतता माैन पाळल्यानेही टिकते...

21 Jul 2021 13:21:25
 

family_1  H x W 
 
खरंतर आपलं रूटीन, जीवनशैली, सामाजिक भेटीगाठी, काम करण्याची परिस्थिती या सगळ्या गाेष्टी बदललेल्या आहेत. आनंदाची गाेष्ट म्हणजे आपले कुटुंबीय आपल्या जवळ आहेत. लाॅकडाऊनमध्ये त्यांच्याबराेबर क्वालिटी टाइम घालविण्याची चांगली संधी आहे, पण सतत वाद हाेण्याची शक्यताही वाढू शकते. अशावेळेस पर्सनल स्पेस मेंटेन करण्याची गरज आधीपेक्षा जास्त आहे. याची गरज मुलांपासून माेठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आहे.आरामाची जागा पर्सनल स्पेसला अशी जागा मानली जाते की, जिथे आराम आणि स्वायतत्ता यांची जाणीव हाेते. ही ती जागा असते, जिथे आपण आपण असताे. आपल्यावर काेणत्याही अपेक्षेचं ओझं नसतं किंवा मागणी पूर्ण करण्याचा दबाव.संतुलनाचे ध्यान पर्सनल स्पेसमध्ये काही वेळ घालविणे यामुळे तणाव आणि कामाचा थकवा नाहीसा हाेण्यास मदत हाेते.
 
खरंतर क्वालिटी टाइम व्यतीत करणे आणि पर्सनल स्पेसमध्ये राहणे यामध्ये संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे. आधीच सांगा स्वतःसाठी स्वतंत्र वेळ ठेवा. तुम्ही तुमच्या जवळच्या व्य्नतींना सांगू शकता की, या काळात माझ्याशी संपर्क ठेवू नका, पण गरज पडल्यास बाेलण्यास किंवा उठून काम करण्यासाठी तयार राहा.आवडीचं काम करा यादरम्यान असं काही करा, ज्यामुळे तुम्हाला छान वाटेल. या वेळात तुम्ही छंदासाठी वेळ काढू शकता. काही नवीन काैशल्यं शिका. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.तर्क काढू नका इतरांची पर्सनल स्पेस आणि तणाव पळविण्यासाठी काय करावं आणि काय करू नये, याविषयी जास्त तर्क काढू नका. टीव्ही बघणं चांगली गाेष्ट नाही, माेबाइलमध्ये काय बघत असतेस, एवढा वेळ पूजा करण्याने काय हाेणार, अशा प्रकारची टिपण्णी देणं टाळा.
Powered By Sangraha 9.0