ठाण्यात सक्रिय रुग्णसंख्या हजारांच्या आत : रिकव्हरी रेट 97.82 टक्के

    21-Jul-2021
Total Views |
 
रुग्ण दुपटीचा कालावधी 1461 दिवसांवर
 

corona_1  H x W 
 
ठाणे महापालिका क्षेत्रात आठ दिवसांपूर्वी सक्रिय काेराेना रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेल्याने शहराची चिंता वाढली हाेती. परंतु, दाेन दिवसांतच रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा एक हजाराच्या आत आला आहे. हा आकडा अद्यापही कायम आहे. तसेच, शहरात शंभरच्या आत काेराेना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील काेराेना स्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण 97.82 टक्क्यांवर, तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1461 दिवसांवर गेला आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात जूनमध्ये काेराेना स्थिती नियंत्रणात आली हाेती.कळव्यातील काही भागांत काेराेना रुग्ण संख्येत वाढ हाेऊ लागल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली हाेती. त्यानंतर पालिका प्रशासनाने कळवा परिसरात काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी उपाययाेजना करण्यास सुरुवात केली आणि दाेन ते तीन दिवसांत येथील परिस्थिती पुन्हा आटाेक्यात आली हाेती.
 
जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहरात सक्रिय काेराेना रुग्णांची संख्या एक हजाराच्या आतमध्ये हाेती. 7 जुलैनंतर शहरात रुग्ण संख्या वाढू लागली आणि त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली. सलग तीन दिवस हा आकडा कायम हाेता. त्यामुळे शहराची चिंता वाढली हाेती. रुग्ण संख्येत अचानक वाढ झाल्याने प्रशासनही सतर्क झाले हाेते.काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी प्रशासनाने उपाययाेजना करण्यास सुरुवात केली हाेती. परंतु, तीन दिवसांनंतर पुन्हा रुग्ण संख्या कमी हाेऊ लागली.
शहरात सध्या नऊशेच्या आसपास सक्रिय रुग्ण आहेत, तर शहरात राेज 90 ते 96 च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. दिवसाला एक ते दाेन मृत्यूची नाेंद हाेत आहे. त्यामुळे शहरात काेराेना स्थिती आटाेक्यात असल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली.