पेन्शनच्या पैशांतून रस्त्यावरील खड्डे बुजविणारे जाेडपे

    21-Jul-2021
Total Views |
 
 

Potholes_1  H x 
 
तेलंगणा राज्यातील रहिवासी गंगाधर तिलक कतमन (वय 73) आणि त्यांची पत्नी साै. व्यंकटेश्वरी गेल्या 11 वर्षांपासून स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवीत आहेत. यासाठी या जाेडप्याने पेन्शन म्हणून मिळालेले 44 लाख रु. खर्च केले आहेत. गंगाधर कतमन म्हणाले की, रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्यावर मी हैद्राबादला स्थायिक झालाे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा अपघात हाेतात.मी या संदर्भात अनेक वेळा सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या पण काेणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे मी आणि माझी पत्नी आम्ही उभयतांनी आतापर्यंत 2,030 खड्डे बुजविले आहेत. हे जाेडपे दरराेज सकाळी त्यांच्या कारने घराबाहेर पडतात व जेथे खड्डा दिसेल तेथे थांबून हे जाेडपे स्वतः खड्डा बुजविते आणि मगच पुढे जाते. त्यांनी आपल्या कारला ‘पथ हाेल अ‍ॅम्ब्युलन्स’ असे नाव दिले आहे.गंगाधर कतमन यानी 35 वर्ष रेल्वेत नाेकरी केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले व एका साॅफ्टवेअर कंपनीत नाेकरी सुरू केली; पण रस्त्यांची दुर्दशा आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पाहून त्यांनी नाेकरी साेडली. स्थानिक लाेक त्यांना ‘राेड डाॅ्नटर’ म्हणतात.
त्यांनी श्रमधन नावाची संस्था देखील स्थापन केली आहे.