आंतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात मराठी सिनेमा झळकण्यास पुढाकार घेऊ

    21-Jul-2021
Total Views |
 
 सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची ग्वाही
 

IFCI_1  H x W:  
 
कान चित्रपट महाेत्सवाबराेबरच गाेवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात (इफ्फी) गेल्या काही वर्षांपासून सर्वाेत्तम मराठी चित्रपट सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाठवण्यात येत आहेत. सप्टेंबर ते नाेव्हेंबर या काळात आयाेजिण्यात येणाऱ्या बर्लिन, व्हेनिस, टाेरँटाे, सनडान्स व न्यूयाॅर्क चित्रपट महाेत्सवांत मराठी चित्रपट झळकण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादितच्या संचालक मंडळाची 157 वी बैठक मंत्रालयात अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
 
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव साैरभ विजय, महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक आंचल गाेयल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थाेरात, सांस्कृतिक कार्यसंचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य आणि महामंडळाचे अधिकारी उपस्थित हाेते.कान महाेत्सवासाठी कडूगाेड आणि मी वसंतराव या दाेन चित्रपटांची निवड समिती सदस्यांनी केली आहे. या बैठकीत या दाेन्ही चित्रपटांच्या निवडीबद्दल संबंधित संस्थेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांचे अभिनंदन देशमुख यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.