पुण्यातही महिलांसाठी माेफत पीएमपी सेवा; लक्ष्मीनारायण मिश्रा यांची माहिती

    21-Jul-2021
Total Views |
 
 

Free Bus For women_1  
 
दिल्लीच्या धर्तीवर पुण्यातही महिलांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून संपूर्ण माेफत प्रवासाची सुविधा देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी येथे दिली. मिश्रा यांनी नुकताच पीएमपी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनतर त्यांनी पीएमपीच्या सर्व विभागांचा आढावा घेतला. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक डाॅ. चेतना केरुरे, वाहतूक व्यवस्थापक (प्रभारी) दत्तात्रय झेंडे, जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) सतीश घाटे आदी उपस्थित हाेते.पीएमपीची प्रवासी संख्या वाढवणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास प्राेत्साहन देणे आदींसाठी महिलांना माेफत प्रवास सुविधा देण्याचा विचार आहे. मात्र, त्यापूर्वी एकूण प्रवाशांत महिलांची संख्या किती, त्याचा महामंडळावर किती भार पडेल, या गाेष्टींचा विचार केल्यानंतरच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.
 
तसेच, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला विशेष बसची संख्या वाढवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून पीएमपीच्या उत्पन्नात माेठी घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात उत्पन्नवाढीवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. प्रवाशांना त्यांच्या मार्गावरील बसचे लाइव्ह लाेकेशन कळाले पाहिजे.बसमध्ये चढल्यानंतर यूपीआय पेमेंटद्वारे क्यूआर काेड स्कॅन करून तिकीट काढण्याची साेय माेबाइलद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच, प्रवाशांच्या सेवेबाबतच्या विविध तक्रारींसाठी हेल्पलाइन आणि पीएमपी ई-कनेक्ट अ‍ॅप्लिकेशन याचे सक्षमीकरण करण्यात येईल, असे मिश्रा यांनी सांगितले.