बसल्या जागी तुम्हाला करता येईल व्यायाम

    21-Jul-2021
Total Views |
 
 
 

Exercise_1  H x 
 
नेहमी असे ऐकण्यात आले आहे की, दिवसभर बसून राहणे आराेग्यासाठी चांगले नसते. ते खरेही आहे; पण ज्यांचा सारा दिवस बसून जात असेल, म्हणजेच बैठ्या कामात जात असाल त्यांना वारंवारफिरणे शक्य नसते. ऑिफसात थाेडेार चालणे हाेत हाेते; पण आता तर बहुतेकजण घरूनच काम करीत आहेत आणि अनेक तास बसून राहात आहेत.परिणामी बसून बसून वजन वाढत आहे आणि शरीरात सुस्ती वाढत आहे. अशावेळी खुर्चीवर बसल्या बसल्या काही हलके; पण प्रभावी व्यायाम करू शकता. यामुळे वजन कमी हाेईल आणि शरीरयष्टीही याेग्य राहील. हे व्यायाम त्यांच्यासाठीही उपयुक्त आहेत ज्यांना बसून राहायला आवडते.
 
सायकलिंग : खुर्चीत टेकून बसा. मान सरळ ठेवा. पाय सरळ करा. या अवस्थेत शरीर सरळ उतरते दिसून येईल.आता या अवस्थेत पाय असेफिरवा जसे सायकलचे पायडल मारीत आहात. पायांसाेबत हातही गाेल गाेलफिरवा. उजव्या पायासाेबत डावा हात वर उचलेल व डाव्या पायासाेबत उजवा हात. पाय एवढे वर उचलायचे की, गुडघे छातीपर्यंत येतील.
 
फायदा : पायांसाेबत हातांचाही व्यायाम हाेईल.संपूर्ण शरीराला व्यायाम हाेईल.
 
लेफ्ट-राइट : खुर्चीवर सरळ बसा. आणि चेहरा समाेर ठेवा. दाेन्ही हात वरच्या बाजूला वळवा व तळहात डाेक्यामागे ठेवा. आता हात अशा अवस्थेत ठेवत डाेके व उजव्या हाताचे काेपर डावीकडे खाली झुकवा आणि डाव्या पायाचा गुडघा वर आणत उजव्या हाताच्या काेपराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. आता हीच प्रक्रिया दुसऱ्या बाजूनेही करावी.
 
फायदा : यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम हाेईल.वजन नियंत्रित राहील.
 
पायांचा व्यायाम : खुर्चीवर सरळ बसावे. समाेर पाहावे.हात खुर्चीवर सरळ ठेवावेत. उजवा पाय वर उचलून सरळ करावा. नंतर खाली नेत समकाेनात ठेवावा. आणि साेबत डावा पाय वर उचलत सरळ ठेवावा. पाय जेवढा वर उचलाल तेवढे उत्तम स्ट्रेचिंग हाेईल. हा व्यायाम अनेकदा करावा.
 
फायदा : यामुळे मांड्या व गुडघ्यांचा व्यायाम हाेईल.कंबरेची चरबी कमी करण्यासाठी कंबर ट्विस्ट करा खुर्चीवर थाेडे पुढे हाेऊन बसावे आणि पाठीचा कणा सरळ ठेवावा. समाेर पाहावे आणि पाय समकाेनात जमिनीवर सरळ ठेवावेत. आता श्वास घेताना मान व खांदे मागे वळवावेत आणि शरीर समाेर सरळ ठेवावे. असे वळावयाचे आहे की, जसे आपण मागे पाहू इच्छित आहात. हातांच्या स्थितीवरही लक्ष द्यावे. जर उजवीकडे मागे वळला असाल, तर डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवावा. आणि उजवा हात खुर्चीच्या बॅकवर. काही क्षण या स्थितीत थांबावे.हीच प्रक्रिया दुसऱ्या बाजूनेही करीत डावीकडे वळावे. हा व्यायाम किमतान 5 ते 6 वेळा दाेन्ही बाजूंना करावा.
 
फायदा : कंबरेची चरबी कमी हाेईल.