टॅटूतून ती कमावते काेट्यवधी रुपये

21 Jul 2021 12:48:33
 
 

Dona Nipar_1  H 
 
 
बाॅडी पेंटिंग आणि टॅटूचा छंद अलीकडे तरुणांची क्रेझ झाली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये चार मुलांची आई आणि एक माॅडेल चर्चेत आहे. डाेना निपर नावाची ही माॅडेल आहे. असे समाेर आले आहे, की तिच्या शरीराचा प्रत्येक भाग विविध प्रकारच्या टॅटूने भरलेला दिसत आहे.तिच्या चेहऱ्याशिवाय इतरत्र टॅटू दिसून येत आहेत. डाेनाची छाती आणि पाेट माेठ्या प्रमाणात काळ्या शाईने रंगविले गेले आहे. त्याच वेळी, तिचे हात फुलांनी काेरले गेले आहेत. डाेनाच्या शरीरावर बनविलेले टॅटू पाहणाऱ्या लाेकांची कमतरता नाही. मात्र, सध्या टॅटूतून तिचा एक हात आणि चेहरा वगळला गेला आहे.
 
डाेना हिने साेशल मीडियावर लिहिलेल्या पाेस्टमध्ये सांगितले, की पतीपासून विभक्त झाल्यामुळे आणि लाॅकडाऊनमुळे ती तुटली हाेती. खचली हाेती. तिच्या मानसिक आराेग्यावर परिणाम झाला. त्यानंतर तिने काही सर्जनशील काम करण्याचा विचार केला आणि आज ती आनंदी आहे.डाेना निपर सांगते, की जेव्हा तिने वजन करणाऱ्या मशीनवर पाऊल ठेवले, तेव्हा तिला धक्का बसला.तिने वजन कमी करण्यासाठी दारूची सवय साेडून दिली. ती केवळ फॅन्सच्या मदतीने आपले जीवन जगत आहे. ही एक ऑनलाइन सबस्क्रिप्शन प्लॅटफाॅर्मवर तिच्या बाॅडी लुकमुळे ती दरमहा सुमारे दाेन लाख पाैंड स्टर्लिंग म्हणजेच सुमारे दाेन काेटी रुपये कमावत आहे.
Powered By Sangraha 9.0