अमृता शेरगिल यांच्या चित्राचा 37 काेटींना लिलाव

    21-Jul-2021
Total Views |
 
 
Amruta Shergil_1 &nb
 
 
अमृता शेरगिल यांच्या चित्राचा 37 काेटींना लिलाव प्रसिद्ध भारतीय कलाकार अमृता शेरगिल यांनी 1938मध्ये चितारलेल्या ‘इन द लेडीज एनक्लाेजर’ या पेंटिंगचा मुंबईत सॅफ्राॅन आर्ट तर्फे लिलाव केला गेला असून, या पेंटिंगला विक्रमी 37.8 काेटी रुपये किंमत मिळाली आहे.या मुळे अमृता शेरगिल सर्वाधिक किमतीला विकल्या गेलेल्या कलाकृतीमध्ये दाेन नंबरच्या भारतीय कलाकार ठरल्या आहेत. यापूर्वी व्ही.एस. गायताेंडे यांचे टायटल नसलेले एक चित्र 39.98 काेटींना मार्चमध्ये विकले गेले आहेअमृता या प्रतिभावान कलाकार हाेत्या. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी पेंटिंग, पियानाे वादनात काैशल्य मिळविले हाेते.त्यांचे शिक्षण फ्रान्स मध्ये झाले तरी मनाने त्या शेवटपर्यंत भारतीय हाेत्या. नऊ श्रेष्ठ भारतीय कलाकारांमध्ये त्यांचा समावेश हाेता. 1941 साली त्या पतीसह लाहाेर येथे गेल्या हाेत्या. तेथे त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन भरविले जाणार हाेते. पण दुर्दैवाने आजारी पडून वयाच्या 28व्या वर्षीच त्यांचे निधन झाले हाेते.