मीन

    20-Jul-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात कार्यक्षेत्रातील कामासंबंधित तुमची धावपळ जास्त राहणार आहे.बचतीचा विचार करूनच गुंतवणुकीबाबत विचार करावा. व्यापारात शत्रूपासून सुरक्षित राहावे. ते काेणत्याही मार्गाने तुमचे नुकसान करू शकतात. जवळच्या प्रवासाचा याेग आहे. कार्यक्षेत्रात कामाचे प्रेशर जास्त राहील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासासंबंधित विषयांकडे जास्त लक्ष द्यावे व मित्रांसाेबत भटकण्यावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा आपल्या शिक्षणावर याचा दुष्परिणाम हाेऊ शकताे. व्यावसायिक जातकांकडे पैशाचा ओघ संथपणे चालू राहील.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमचे पूर्वीचे प्रेमसंबंध मधुर राखण्यासाठी तुमच्या वागण्या-बाेलण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. भावांसाेबत एखाद्या बाबीवरून चर्चा हाेण्याची शक्यता आहे. यावेळी संदिग्ध माहितीमुळे गैरसमज उत्पन्न हाेणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या आराेग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. डाेळ्यांसंबंधित समस्यांशी झुंजत असाल तर वेळीच त्यांची तपासणी करून घ्यावी. सध्या एखाद्या कारणामुळे तुम्हाला दुखापत हाेण्याची शक्यता आहे.
यासाठी सावध राहणे आवश्यक आहे.
 
शुभदिनांक : 18, 19, 23
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात व्यावसायिंकांनी त्यांचा पैसा गैरजागी वापरला जाणार नाही याची विशेष दक्षता घ्यायला हवी.
 
उपाय : घरातून बाहेर पडताना थाेडासा गूळ खावा. आई-वडिलांच्या पाया पडून आर्शीर्वाद घ्यावा. शारदामातेची पिवळी फुले वाहून पूजा करावी.