थ्रेड वर्कचे जॅकेट ही फॅशन साेळाव्या, सतराव्या शतकातील आहे, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच या प्रकारच्या नक्षीकामामध्ये नाचणारे लाेक, माेर, हत्ती, पक्षी अशा प्रकारची पारंपरिक डिझाइन दिसतात. फक्त जॅकेटच नव्हे, तर साड्या, ब्लाऊज, बेडशीट, उशांचे अभ्रे, माेबाइल कव्हर यातही या कामाचा प्रभाव दिसून येताे.मशीनचा वापर न करता, हातानं हे वर्क केलं जातं. रेशीम किंवा सुती कपड्यांवर विविध रंगाच्या दाेऱ्यांनी हे नक्षीकाम हाेतं.विशेषतः गडद रंगात ते उठून दिसतं. हिरवा, लाल, जांभळा, पिवळा, काळा, केशरी, गुलाबी अशा अनेक रंगांचा वापर यासाठी केला जाताे. यासाेबतच त्यात काच, कुंदन, टिकली वर्क याचं नक्षीकामही केलं जातं.
सुरुवातीला या नक्षीकामातील केवळ घागरा-चाेळी प्रसिद्ध हाेती. त्यानंतर फॅशनमधल्या तज्ज्ञांनी त्यात विविध प्रयाेग करत जॅकेट आणि इतर प्रकारांतही त्याचा वापर करायला सुरुवात केली.थ्रेड वर्कच्या जॅकेटचं वैशिष्ट्यं म्हणजे भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दाेन्ही प्रकारच्या कपड्यांवर ही जॅकेट वापरू शकता. हे जॅकेट तुम्ही पांढऱ्या किंवा काेणत्याही प्लेन टीशर्टवर घालू शकता.
यासाेबत स्कर्ट किंवा जीन्स काहीही घालता येईल. तुम्हाला अस्सल पारंपरिक लूक हवा असेल, तर एखाद्या प्लेन पंजाबीवरही घालता येईल.