सलाेख्याचे नातेसंबंध ठेवतात आनंदी अन् समाधानी

    20-Jul-2021
Total Views |
 
 
 

happiness_1  H  
 
आनंदी स्वभाव असेल, तर जगणेसुद्धा तसे हाेते. काही लाेक नेहमी मजेत, समाधानात दिसतात. भरपूर पैसा असल्यामुळे हे लाेक मजेत असल्याची बहुसंख्यांची समजूत हाेत असली, तरी ती खरी नाही. पैशामुळे भाैतिक सुखे मिळत असली, तरी आनंद विकत घेता येत नाही. ताे आपल्यातच निर्माण करावा लागताे. ताे मिळवायचा मार्ग अगदी साेपा आहे. सगळ्यांबराेबर सलाेख्याचे संबंध ठेवलेत, नातेसंबंध जाेपासलेत, तर तुम्हीसुद्धा छान जगू शकता.
 
संध्यानंद.काॅम आयुष्याच्या प्रवासात आपण राेज काेणाला ना काेणाला भेटत असताे.त्यातील प्रत्येकाबराेबर आपला स्वभाव जुळणारा असताे असे नसले, तरी आपले त्यांच्याबराेबर व्यवहार हाेतात, बाेलणे हाेते. व्यक्ती तित्नया प्रकृती या नात्याने भिन्न स्वभावाची माणसे आयुष्यात येतात आणि जातात. श्रीमंत, धनवान माणसे सुखी असल्याचा सर्वसाधारण समज असला, तरी ताे खरा नाही. कारण अशी अनेक माणसे कायम काही ना काही तक्रारी करताना दिसतात. त्याच्या उलट फार पैसा नसलेली माणसे अगदी मजेत जगताना दिसतात. ही माणसे कायम हसतमुख असतात. आपल्याकडे काही नाही याचा खेद त्यांना नसताे.पैशामुळे सर्व सुखे विकत घेता येत असल्याचा एक गैरसमज आहे. पण, त्याला काय आधार आहे याचा विचार आपण केला आहे का? आतापासूनच खूप कष्ट कर, त्यातून भरपूर पैसा मिळेल आणि भविष्यात सुखी हाेशील, असा आपल्या मनावर लहानपणापासून बिंबविले जाते.
 
भरपूर पैसा म्हणजेच सुखी आयुष्य ही समजूत त्याला कारणीभूत आहे. पण, हार्वर्ड विद्यापीठात झालेल्या एका संशाेधनाने या समजाला छेद दिला आहे. आनंदी आणि निराेगी आयुष्याचा पाया भक्कम नातेसंबंधांवर असल्याचे हे संशाेधन सांगते. तब्बल 75 वर्षांच्या अभ्यासानंतर आणि 724 लाेकांच्या जीवनाची पाहणी करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि लाेकांमध्ये मिसळण्याची आवड असलेल्यांना एकटेपणाची समस्या जाणवत नाही. आपले कुटुंब, नातलग आणि मित्रांबराेबर नेहमी संपर्कात असेलेले लाेक शारीरिकदृष्ट्या अधिक निराेगी असतात आणि त्यांना दीर्घायुष्य लाभत असल्याचे या संशाेधनातून सिद्ध झाले.म्हणजेच, एकटे राहण्याची सवय शारीरिक आणि मानसिक आराेग्याला घातक असल्याचे दिसते. सतत एकटे राहणारे लाेक चिडचिडे हाेतात आणि मध्यम वयाचे झाल्यावर त्यांची प्रकृती हळूहळू बिघडायला लागते. त्यातून त्यांचे मानसिक स्वास्थ्य खराब हाेते.
 
त्यामुळेच आपल्या जीवनात आलेल्यांबराेबर सुसंवाद ठेवणे फार महत्त्वाचे असल्याचे हे संशाेधन सांगते.कुटुंबीयांबराेबरच मित्र आणि नातलगांबराेबर नियमितपणे संपर्कात राहून त्यांची खबरबात ठेवा, असा सल्ला देण्यात आला आहे.चांगले संबंध म्हणजे आनंदी जीवन चांगल्या आराेग्यासाठी नातेसंबंध किती महत्त्वाचे असतात हे या संशाेधनात दिसले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आपल्या नातेसंबंधांबाबत संतुष्ट असलेले लाेक त्यांच्या वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा उत्तम आराेग्य सांभाळून हाेते. वयाची पन्नाशी जवळ आल्यावर यापुढे चांगले आराेग्य हीच सर्वांत माेठी संपत्ती असल्याची जाणीव सर्वांना हाेते आणि ती चुकीची नाही. पण, आराेग्य उत्तम राखण्यासाठी काय अटी आहेत हे आपण बघत नाही.संतुलित आहार, नियमित फिरायला जाणे आणि रक्तदाब-काेलेस्ट्राॅलवर नियंत्रण ठेवणे हे चांगले असले, तरी त्यामुळे शरीर निराेगी राहिले, तरी मानसिक शांतता मिळत नाही. शारीरिक आराेग्य जपताना नातेसंबंधांचे आराेग्यही जपणे हा त्यावरचा उपाय आहे.
 
तुमच्यावर काेणी नाराज असेल, तर त्याची समजूत काढा आणि तुम्ही काेणावर रागावला असाल, तर त्याला माफ करून विषय संपवा. याचा फायदा म्हणजे आपले मन शांत हाेते आणि शांत मन म्हणजे निराेगी आयुष्य एवढे हे साेपे आहे.अकारण चिंता करू नका चांगल्या नातेसंबंधांमुळे आपण आनंदी राहत असलाे, तरी कधी तरी वाद-मतभेद हाेणे ही स्वाभाविक घटना आहे. त्याचा परिणाम आपल्यावर किती हाेऊ द्यावा हे आपणच ठरवायचे असते. एक उदाहरण घेऊ. एखाद्या मुद्द्यावरून तुमचा मित्राबराेबर रात्री वाद झाला, तर त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसावर हाेणे साहजिक असते. नवा दिवस तुम्हाला तणावाचा जाताे. कदाचित तुमच्या कामामध्ये अथवा सहकाऱ्याबराेबरच्या वागण्यात फरक पडू शकताे.वादाचा परिणाम आपल्या राेजच्या जीवनावर न हाेऊ देणे हा यातून घेण्याचा धडा आहे. त्यावर मार्ग म्हणजे काेणत्याही घटनेचा अतिविचार न करणे, ती मनाला फार लावून न घेणे.
एखाद्याच्या मताबराेबर तुम्ही सहमत नसाल, तर आपण का सहमत नाही याचा शांतपणाने विचार करा. कदाचित तुम्हाला त्याचे कारण सापडेल आणि मतभेद दूर हाेतील. बाेलणे बंद करणे हा त्यावर उपाय नाही.
 
संवादातूनच मार्ग सापडताे हे लक्षात ठेवा.नातेसंबंध असतात अनमाेल माणूस हा सामाजिक असल्यामुळे त्याला शेवटपर्यंत समाजाच्या मदतीची गरज असते.हे वैशिष्ट्यच त्याला इतर सजीवांपासून वेगळे करते. सुखी आणि आनंदाची आयुष्याची इच्छा व्यक्त करताना आपण त्यात फक्त भाैतिक सुखे गृहीत धरताे आणि ती मिळविण्यात सगळी शक्ती खर्च हाेते.यशस्वी करिअर, आलिशान घर आणि भारी माेटार म्हणजे सफल जीवन अशी आपली धारणा झालेली आहे. पण, ही भाैतिक सुखे आपल्या गरजेनुसार कमी-अधिक हाेऊ शकतात याचा विचार केला आहेत का? सर्व भाैतिक सुखांची प्रत्येक वेळी गरज नसली, तरी नातेसंबंधांची आवश्यकता आयुष्यभर असते. कारण एका वयानंतर माणूस थकायला लागताे.भाैतिक सुखांपेक्षा माणसांची गरज त्याला जास्त असते आणि जाेपासलेले संबंध तेव्हा उपयाेगी पडतात. त्यामुळे कायम नातेसंबंध जपण्याला प्राधान्य द्या. प्रेम, दया, साैहार्द आणि सहानुभूतीवर संबंध टिकतात.तुमचे तसे असतील, तर परमेश्वराचे त्यासाठी आभार माना. असे संबंध जाेपासलेत, तर तुमचे जीवन किती आनंददायी आहे हे तुम्हाला जाणवेल.