डाेळ्यांचा त्रास टाळण्यासाठी व्यायाम अवश्य करा

    20-Jul-2021
Total Views |
 
 
eyes_1  H x W:
 
 
अंगठ्याकडे लक्ष द्या. हळूहळू अंगठा नाकाच्या जवळ घ्या आणि लांब न्या. अंगठ्यावर लक्ष केंद्रित करा. एकदा श्वास घेण्यासाठी थांबा. मग अंगठ्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे डाेळ्यांचा थकवा दूर हाेईल. फोकस बदला : काॅम्प्युटरवर काम करत असताना, मध्ये मध्ये डाेळ्यांचा फोकस एखाद्या लांब असणाऱ्या वस्तूवर करा. एक दीर्घ श्वास घ्या. मग हळूहळू आपली नजर तुमच्या आजूबाजूच्या वस्तूवर केंद्रित करा. पाच वेळा असं करा. डाेळ्यांना आराम मिळेल. डाेळे गाेल गाेल फिरवा : पाठ ताठ ठेवा आणि एक दीर्घ श्वास घेत ताठ बसा.
 
डाेळे बंद करा आणि बुबुळ वर-खाली, गाेल गाेल फिरवा.हे पाच-दहा वेळा करा. अशाप्रकारे डाेळे मध्ये मध्ये 3-5 सेकंदांसाठी बंद करा, परत उघडा. सात वेळा असं करा.यामुळे डाेळ्यातील ओलावा टिकून राहताे. तसंच पापण्या पटकन उघडा-बंद करा. 30-60 सेकंदांपर्यंत असं करा.ही आसनं नियमित करा. यामुळे डाेळ्यांना आलेला थकवा नाहीसा हाेईल. डाेळे दीर्घकाळ निराेगी राहतील.