या आठवड्यात तुम्ही प्राेफेशनल आघाडीवर खूप सक्रिय राहणार आहात.कुटुंबीयांसाेबतचे व प्रियव्यक्तीसाेबतच्या संबंधात तुम्हाला समाधान लाभणार नाही. सध्या माैजमस्ती व ल्नझरी लाइफस्टाइलवर कमी खर्च कराल.जमीनजुमल्याच्या व्यवहारातून फायदा हाेण्याची शक्यता आहे.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या व्यवसायात वेगाने विस्तार हाेण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या कंपनीचा टर्नओव्हर वाढेल. तुमचा ग्राहक आधारही मजबूत हाेईल. जमीन, घर वा इतर स्थावर संपतीसंबंधित कारभारातील जातकांना खूप फायदा मिळण्याची शक्यता आहे. वडिलाेपार्जित संपत्तीमुळे अचानक आर्थिक लाभ हाेईल.
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधात सुख-शांती टिकून राहण्याची शक्यता आहे. जर नात्यांमध्ये पूर्वीपासून तणाव असेल तर यावेळी तणाव संपण्याची शक्यता आहे. मुलांकडून मान व प्रेम मिळण्याची संभावना आहे. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. तसेच वैवाहिक जीवनात जाेडीदाराशी संबंध मजबूत हाेतील.
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला आराेग्याबाबत जास्त त्रास असणार नाही.एखाद्या अज्ञात चिंतेमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. यावेळी काेणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. ध्यान व याेग करायला हवा. तेलमालिश अवश्य करवून घ्यावे.
शुभदिनांक : 20, 21, 24
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात वाहन चालवताना सावध राहा. वेग नियंत्रित ठेवा.बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्यांपासून दूर राहा.
उपाय : या आठवड्यात जर नित्यनेमाने घरातील पहिली चपाती वा भाकरी गायीला व शेवटची कुत्र्याला दिली तर तुमच्या भाग्याची दारे उघडतील.आदित्यस्ताेत्राचे पठण कराव