कर्क

    20-Jul-2021
Total Views |
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुम्ही प्रवासाला जाल. तुमचा प्रवास लाभदायक ठरेल. नवीन व्यक्तींना भेटणे हाेईल. मनात उत्साहाचे विचार संचारतील. भविष्याच्या याेजना तयार कराल. कार्यक्षेत्रांत कामाची प्रशंसा हाेईल. पदाेन्नतीचे याेग जुळून येतील.देवघेवीच्या बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी. घरनिर्मितीच्या कामात प्रगती हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात जास्तीत जास्त उंचीवर पाेहाेचावे अशी तुमच्या मनात इच्छा राहील. नाेकरदार व्यक्तींनी वरिष्ठांसाेबत कामाशिवाय इतर काेणत्याही चर्चेत पडू नये. तुमच्या विचारांमध्ये पूर्वीपासूनच रचनात्मकता असल्यामुळे हा आठवडा पुढे जाण्यासाठी नव्या विचारांची साथ मिळवून देणारा आहे. एखाद्याबाबतचा द्वेष वा तिरस्कार या आठवड्यात दूर हाेईल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला नात्यात खूपच उत्साह व राेमांच जाणवेल.ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जाेडीदार वा प्रिय पात्राची साथ खूपच आवडेल. तुमच्या जाेडीदाराच्या भाग्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही संभवताे. ज्यामुळे तुमच्या मनात त्याच्याविषयी विशेष भावना निर्माण हाेईल. जाेडीदाराशी माेकळेपणाने बाेलावे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या आराेग्याकडे थाेडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्यात विशेषकरून अ‍ॅसिडिटी, पाेटात जळजळ, रक्ताभिसरणाची तक्रार, डाेळ्यांमध्ये जळजळ असू शकते. संततीप्राप्तीची समस्याही सध्या थाेडे त्रस्त करू शकते. अशा स्थितीत धैर्य व लक्ष देणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
 
शुभदिनांक : 18, 19, 23
 
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : तुमचा तणाव व खर्च वाढेल. सरकारी टॅक्सबाबत वाद हाेऊ शकताे.
 
उपाय : या आठवड्यात साेमवारी एखाद्या गरिबाला पैसे वा कपडे दान द्यावेत.एखाद्या ब्राह्मणालाही एखादी वस्तू दान द्यावी. शिवालयात शिवचालिसा वाचून शिवशंकरासमाेर तुपाचा दिवा लावावा.