बाप रे! मगरीशी मैत्री?

20 Jul 2021 14:56:16
 
 

alligator_1  H  
 
पाण्यात राहून मगरीशी वैर करता येत नाही, असे म्हणतात; पण काेस्टारिका येथील चिट्टाे नावाचा काेळी (मच्छिमार) गेल्या 32 वर्षांपासून एक मगर पाळत हाेता. पण त्याचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्यामुळे चिट्टाे नावाचा हा काेळी नव्या मगराच्या शाेधात आहे.1989 मध्ये रेवेन्टाझाेन नदीच्या किनाऱ्यावर हा मगर जखमी अवस्थेत आढळून आला. चिट्टाे त्याला घरी घेऊन आला व त्याचा इलाज केला. मगर बरा झाल्यावर ताे त्याला पुन्हा रेवेन्टाझाेन नदीत साेडून आला; पण दुसऱ्या दिवशी हाच मगर चिट्टाेच्या घराच्या दरवाजासमाेर झाेपलेला आढळून आला. चिट्टाेने हा मगर पाळला व त्याचे नाव पाेचाे ठेवले.चिट्टाे या मगराला दरराेज 30 किलाे चिकन आणि आठवड्यातून एकदा मासे खाऊ घालत असे. सुरुवातीला मगर हे खाद्य खात नव्हता; पण हळूहळू हा मगर चिट्टाेने दिलेले खाद्य खाऊ लागला हाेता.सुरुवातीला नुसता हात लावला तरी हा मगर चिडत असे; पण नंतर ताे चिट्टाेचा मित्र बनला. माणसाच्या सहवासात हिंस्त्र पशुही स्वभाव बदलतात, हेच यावरून सिद्ध हाेते.
Powered By Sangraha 9.0