काम व व्यक्तीगत आयुष्यामध्ये संतुलनाची भारतीयांची कसरत

20 Jul 2021 15:06:31

 
 
घरून काम करण्याबाबत ‘स्क्रिप्ट’च्या अहवालातील माहिती
 

Work-Life Balance_1  
 
काेराेना महामारी सुरू झाल्यापासून काम आणि व्यक्तीगत आयुष्याचे संतुलन साधण्यासाठी भारतीय कर्मचारीवर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.‘स्क्रिप्ट’च्या अहवालातून ही माहिती मिळते.महामारी सुरू झाल्यावर ती राेखण्यासाठी लाॅकडाऊनचा उपाय केला गेला. त्यामुळे बहुसंख्य कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची पद्धत स्वीकारावी लागली. त्याचा परिणाम म्हणजे स्क्रीनटाइम आणि नेटवर्किंग वाढले; पण त्यामुळे कर्मचाऱ्यांना व्यक्तीगत आयुष्यासाठी कमी वेळ मिळताे.सध्या सगळे जण घरून काम करत असल्यामुळे कामासंबंधीच्या मेसेजना उत्तरे देण्यात 67 टक्के लाेकांचा दिवस जाताे. त्यात मुंबई अव्वल असून, तेथे घरी असताना कामासंबंधीच्या मेसेजना उत्तर देण्यात 85 टक्के लाेकांचा वेळ जाताे. त्या पाठाेपाठ काेलकाता (65 टक्के), दिल्ली (60 टक्के) बंगळुरू (59 टक्के) या शहरांतील लाेक येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
 
घरून काम करताना जागेचा प्रश्न हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरताे. भारतातील प्रत्येक घरात कामासाठी म्हणून खास जागा नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना ‘स्वत:’ची अशी जागा मिळत नाही. मुंबई, दिल्ली, काेलकाता आणि बंगळुरू या माेठ्या शहरांत हा प्रश्न प्रामुख्याने जाणवताे.घरून काम करण्यात जास्त वेळ जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांना व्यक्तीगत कामांसाठी वेळच उरत नसल्याचे हा अहवाल सांगताे. कामात जात असलेल्या वेळामुळे ते करत असतानाच अन्य कामांचे नियाेजन केले जात असल्याच आढळले आहे. मुंबईतील 47 टक्के कर्मचारी काम करत असताना जेवणाचा बेत काय असावा याचे नियाेजन करत असतात. काेलकात्यातील 48 टक्के कर्मचारी काम करताना मुलांना गृहपाठ पूर्ण करण्यास मदत करतात. बंगळुरूतील 85 टक्के कर्मचारी काम करताना दुसऱ्या करिअरचा विचार करतात. हेच प्रमाण दिल्लीत 72 टक्के असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0