वैष्णाेदेवीच्या दरबारात 10 दिवसांत 1 लाख भाविक पाेहाेचले

    20-Jul-2021
Total Views |

vaishnodevi_1
काेराेनाची लाट कमी हाेऊन स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे व निर्बंध शिथिल झाल्यानंतर देशभरातून भाविक माता वैष्णाेदेवी दरबारात पाेहाेचू लागले आहेत. माता वैष्णाेदेवी श्राईन बाेर्डाचे सीईओ रमेशकुमार यांनी सांगितले की, ज्या वेळी काेराेनाचा जाेर जास्त हाेता, त्या वेळी भाविक फारच कमी संख्येने देवीच्या दर्शनासाठी आले; पण आता दरराेज सरासरी 10,000 भाविक माताराणीच्या दरबारात हजेरी लावत आहेत.वीकएन्डला ही संख्या 15,000 पर्यंत पाेहाेचते. येत्या काही दिवसांत भाविकांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. या वर्षी 1 जानेवारीपासून आतापर्यंत माता वैष्णाेदेवीचे 20 लाख पेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले आहे, तर गेल्या महिन्यात जूनमध्ये 2 लाख भाविकांनी दर्शन घेतले; पण या महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांतच भाविकांची संख्या 1 लाखांवर गेली आहे. गेल्या वर्षी सन 2020 मध्ये वर्षभरात फक्त 17 लाख भाविक माता राणीच्या दर्शनासाठी आले हाेते. ही संख्या 2019 च्या तुलनेत 78% कमी हाेती.कारण 2018 आणि 2019 या दाेन वर्षांत प्रत्येकी 80 लाख भाविक आले हाेते.
आता भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे दान दक्षिणाही वाढत आहे. माता वैष्णाेदेवी मंदिर देशातील समृद्ध मंदिरापैकी एक आहे.
गेल्या 20 वर्षांत भाविकांनी माताराणीला 1800 किलाे साेने, 4700 किलाे चांदी आणि 2000 काेटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम अर्पण केली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात श्राईन बाेर्डाला 416.45 काेटी रु. उत्पन्न मिळाले. यापैकी 108.70 काेटी रु. व्याज आणि लाभांश तर 158 काेटी रु. दानपेटीद्वारे मिळाले. बाकीची रक्कम भाडे, राॅयल्टी, लायसेन्स फी इ. द्वारे मिळाले तर बाेर्डाने विकास कार्य, सुविधा वाढविणे आणि वेतन यावर 505.6 काेटी रु. खर्च केले. वैष्णाेदेवी यात्रा दरम्यान काेराेना प्राेटाेकाॅलचे सक्तीने पालन करण्यात येत आहे. श्राईन बाेर्डाचे सर्व कर्मचारी बॅटरी कार, राेपवे ऑपरेटर, हेलिकाॅप्टर यांसारख्या सेवेतील सर्वांचे लसीकरण केले आहे. भाविकांना 72 तास अगाेदरचे काेविड निगेटिव्ह रिपाेर्ट दाखविल्यानंतरच मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. यासाेबतच रॅन्डम टेस्ट करण्यात येत आहे. हाॅल, खाेल्या, हाेस्टेल इ. मुक्काम करण्याच्या सर्व जागा नियमित सॅनिटाईज करण्यात येत आहेत.