वृषभ

20 Jul 2021 16:30:12
 
 

horoscope_1  H  
 
 
हा आठवडा तुम्हाला काही नव्या समस्यांवर विचार करण्याचा संकेत देत आहे.आपल्या कुशलतेने आपल्या यशाचा मार्ग प्रशस्त कराल. आपण आपल्या बाेलण्याने एखाद्याला मुग्ध करून फायदा मिळवू शकाल. तसेच भेटीतून संबंध जुळवू शकाल. तुमच्या वैचारिक समृद्धीत वाढ हाेईल व तुमचे मन प्रुल्लित राहील. तुम्ही एखाद्या शुभकार्यासाठी प्रेरित व्हाल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात भागीदारी व संयुक्त उद्याेगात असलेल्या व्यक्तींना काहीशा प्रतिकूलतेतून जावे लागेल. तुम्ही एक नवा उद्याेग सुरू करण्याच्या तयारीत राहाल, पण घाईगडबडीत काेणताही निर्णय घेऊ नये.नाेकरदारांमध्ये उत्साह व स्फूर्ती दाेन्ही उत्तम असल्यामुळे कमी काळात अनेक कामे पूर्ण करू शकतील. दूरच्या कामांना थाेडा उशीर लागेल.
 
नातीगाेती : तुमच्या बाेलण्याच्या प्रभावाने तुम्ही खास व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करण्यातही यशस्वी व्हाल. विवाहाेत्सुक जातकांना विवाहासंबंधित निर्णय घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती उत्पन्न हाेऊ शकते. विवाहितांच्या संबंधतात आपल्या पार्टनरला जास्त स्पेस देण्याची गरज आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील पण अचानक मार लागणे, उतावीळपणे काम करताना मार लागणे यामुळे रक्तस्राव हाेण्याची शक्यता आहे.खेळात व व्यायाम करतानाही मार लागू शकताे. ज्यांना ऑपरेशन करावयाचे असेल त्यांनी आवश्यक टेस्ट करूनच पुढे जावे. शरीराची अस्वस्थता तुमचे ब्लडप्रेशर कमी वा जास्त करू शकते..
 
शुभदिनांक : 20, 21, 24
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : मन इकडे-तिकडे भरकटणार नाही याकडे लक्ष द्यावे.
 
उपाय : सकाळी लक्ष्मीमातेला नमस्कार करून शुभ्र वस्त्र परिधान करावे व लक्ष्मीमातेच्या चित्रासमाेर उभे राहून श्रीसूक्ताचा पाठ करून कमळ वाहावे.
Powered By Sangraha 9.0