आत्महत्येचे आमंत्रण देणारे जपानचे सुसाइड फॉरेस्ट

    20-Jul-2021
Total Views |
 
 

Suicide Forest_1 &nb 
 
एकेकाळी वृक्षांचा समुद्र, वृक्ष सागर, सी ऑफ ट्रीज म्हणून ओळखले जाणारे आओकीगाहारा हे जंगल आता सुसाइडफॉरेस्ट बनले आहे. इ.स. 864 मध्ये माऊंट फ्यूजी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर हे जंगल तयार झाले आहे. आतापर्यंत हजाराे लाेकांनी या जंगलात आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करण्याची सुरुवात मात्र 1960 मध्ये झाली आहे. परंतु लाेक या जंगलातच आत्महत्या करण्यासाठी का जातात, हे रहस्य अद्याप गुलदस्त्यातच आहे.यामुळे आओकी गाहारा जंगलात प्रवेश करण्याची सर्वसामान्य माणसांची हिंमतच हाेत नाही. दरवर्षी हजाराे लाेक या जंगलात आत्महत्या करतात. त्यामुळे या जंगलाचे नावच ‘सुसाइडफॉरेस्ट’ पडले आहे. जपानी भाषेत ‘आओकी गाहारा’ या शब्दाचा अर्थ ‘भुरकट गवताचे मैदान’ असा हाेताे.
 
जपानचा जगप्रसिद्ध पर्वत माऊंट फ्युजीपासून हे सुसाईडफॉरेस्ट 30 चाैरस किलाेमीटर परिसरात तयार झाले आहे. हे जंगल जगातील इतर जंगलाप्रमाणे प्राचीन नाही तर 1157 वर्षांपूर्वी तयार झालेले आहे. 2002 मध्ये या जंगलात एकाच दिवशी 78 लाेकांनी तर 2003 मध्ये याच जंगलात 105 लाेकांनी आत्महत्या केल्या.2010 मध्ये मात्र पाेलिसांनी आत्महत्या करण्यापासून वाचविले. तरीही 54 लाेकांनी आत्महत्या केलीच. जपान सरकार या जंगलात आत्महत्या करणाऱ्या लाेकांची निश्चित संख्या जाहीर करीत नसल्याचाही आराेप हाेत आहे.रंगीत दाेरीचे रहस्य : या जंगलात जाऊन परत आलेल्या अनेक लाेकांनी सांगितले की, हे जंगल भीतीदायक आहे. या जंगलातील वृक्ष जवळ-जवळ असल्यामुळे या झाडांच्या फांद्या आपसात गुंतलेल्या आहेत. या जंगलात सूर्यप्रकाश फारच कमी पडत असल्यामुळे हे जंगल जास्तच भीतीदायक वाटते.