धनू

    20-Jul-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
या आठवड्यात तुम्ही दूरचा वा जवळचा एखादा प्रवसास करू शकता. तुमचा प्रवास सुखद हाेईल. एखाद्या सत्कार्यासाठी पैसा खर्च झाल्यामुळे मनात प्रसन्नता राहील. कार्यक्षेत्रात बदली झाल्याची बातमी मिळू शकते. व्यापारात भागीदारीतून ायदा हाेईल. अचानक एखादी शुभवार्ता कळू शकते. जुने मित्र भेटतील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमचे मन इतर गाेष्टींमध्ये जास्त रमल्यामुळे अभ्यासाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही. स्पर्धापरीक्षेची तयारी करीत असाल तर त्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज आहे. कमाई व संपत्तीत वाढ हाेण्याची शक्यता आहे. टूरिझम, सेल्स व मार्केटिंगसंबंधित जातकांना प्रवास घडेल.
 
नातीगाेती : तुम्ही प्रेमसंबंधाच्या सुंदर जगात प्रवास करीत आहात असे तुम्हाला वाटेल. हा काळही प्रेमसंबंधात पुढे जाण्यासाठी उत्तम आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीपुढे तुमच्या प्रेमाचा प्रस्ताव मांडू शकता.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमचे आराेग्य उत्तम असल्याचे जाणवेल.तुमच्यात जाेम आणि स्फूर्ती खूप असणार आहे. तशी तुम्हाला तुमच्या जाेडीदाराच्या तब्बेतीची चिंता राहील. आराेग्याबाबत काेणतीही बेपर्वाई करू नये.
 
शुभदिनांक : 20, 21, 24
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात फालतू गाेष्टी व भांडणापासून दूर राहा. काेणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.
 
उपाय : या आठवड्यात रात्री घराच्या मुख्य दारापुढे गाईच्या तुपाचा दिवा लावून ठेवा. जर हा दिवा सकाळपर्यंत तेवत राहिला तर आपली आर्थिक स्थिती सुधारून आपल्याला मानसन्मानही मिळणार आहे असे समजा.