जय गणेश अभियानातील विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

    20-Jul-2021
Total Views |
 
 

Result_1  H x W 
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व याेजनेतील दहावीचा निकाल शंभर टक्के लागला.या याेजनेत रेणुका स्वरूप प्रशालेत शिकणारी गंधाली सणस ही विद्यार्थिनी 96.40 टक्केगुण मिळवून प्रथम आली.जय गणेश पालकत्व याेजनेतील आणखी 7 विद्यार्थ्यांनी 90 ट्न्नयांपेक्षा अधिक गुण मिळवले असून, 12 विद्यार्थ्यांनी 80 ट्न्नयांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. महाराष्ट्र विद्यालयात शिकणारा सत्यजित भंडारी याला 95.80 टक्के, भावे हायस्कूलमध्ये शिकणारा लक्ष लाेखंडेला 94.60 टक्के, विमलाबाई गरवारे प्रशालेत शिकणारी प्रेरणा गव्हाणेला 93.80 टक्के, अहिल्यादेवी हायस्कूलमधील शामली राठाेडला 93.80 टक्के,रमणबागेतील साेहम इजंतकरला 92.60 टक्केव इशान माेरेश्वरला 92.40 टक्केआणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक राेड येथे शिकणाऱ्या वेदांत वाडेकरला 92.20 टक्के गुण मिळाले आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष अशाेक गाेडसे म्हणाले, की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.ट्रस्टतर्फे सर्व विश्वस्तांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.