कन्या

    20-Jul-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुम्ही तुमची प्रतिभा क्षमता प्रदर्शित करीत विकासाच्या मार्गावर पुढे जात राहाल. शारीरिक व मानसिक रुपात स्फूर्ती जाणवेल. आर्थिक फायदा हाेण्याची शक्यता आहे. व्यापारात तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांशी नम्रतेने वागण्याची गरज आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक बाबतीत तुम्ही धैर्य बाळगत पुढे जायला हवे. जे जातक आयातनिर्यातीच्या व्यवसायात आहेत त्यांनी सावधानतेने पुढे जाण्याची गरज आहे. स्पर्धापरीक्षा व डिस्टन्स लर्निंगसाठी अनुकूल काळ आहे.
अभ्यासाव्यतिरिक्त बाहेरील विषयांत पुढे जाण्यासाठी याेग्य काळ आहे.
 
नातीगाेती : हा आठवडा प्रेमसंबंधाबाबत खूपच चांगला असण्याची शक्यता आहे.नात्यांसाठीही हा काळ अत्यंत अनुकूल आहे. या काळात तुमचे संबंधफुलांप्रमाणेफुलतील व स्नेहाचा सुगंध पसरवतील. तुम्हाला संबंधाच्या माेर्चाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. भावंडांसाेबतचे संबंध सुधारतील
 
आराेग्य : आराेग्यात चढ-उतार हाेण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून आजारी असलेल्या जातकांच्या तब्बेतीत सुधारणा दिसून येईल. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायला हवे. यासाठी याेगासने व प्राणायामाची मदत घ्यावी. तुमचे आराेग्य सुधारले तर विचारही सुधारतील. प्राणायाम विचारांना याेग्य दिशा देईल.
 
शुभदिनांक : 20, 21, 24
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात आत्मविश्वास जास्त बाळगा तसेच वादविवादापासून स्वत:ला दूर ठेवा.
 
उपाय : या आठवड्यात रक्तचंदन व केशर उगाळून त्याने रंगवलेले कापड जर गल्ल्यात वा तिजाेरीत अंथरले तर तुमची समृद्धी वाढेल. साेबतच सरस्वतीमातेच्या चरणी लाल फुल अर्पण करावे.