सिंह

    20-Jul-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
या आठवड्यात तुम्ही उत्तमप्रकारे प्रगती करू शकाल. सुरुवातीला झालेल्या काही लाभामुळे तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह दाेन्ही चांगला राहील. नात्यांमध्ये उत्साह जागवण्यासाठी एखाद्या पर्यटनस्थळी फिरायला जाल. इतरांवर अवलंबून राहिल्यास तुमची फसवणूक हाेण्याची शक्यता आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही एखादे नवे काम वा नवा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर प्रथम त्या संदर्भातील सर्व पैलूंचा सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. कारण इतरांवर विसंबून तुम्ही काम करू पाहाल तर तुमची फसवणूक हाेण्याची शक्यता जास्त आहे. सरकारी कामे, रसायनशास्त्र, वैद्यक, बँकिंग, शिक्षण क्षेत्रात उत्तम प्रगती हाेईल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या एखाद्या प्रियजनासाेबत प्रवासाला जाऊ शकता. नात्यात जास्त उत्साह येण्यासाठी तुम्ही एखाद्या पर्यटनस्थळी फिरायलाही जाऊ शकता वा एखाद्या डिनरची व्यवस्था करू शकता. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एकांत हवासा वाटेल..
 
आराेग्य : या आठवड्यात तब्येतीत चढ-उतार राहू शकताे. आठवड्याच्या मध्यात निद्रानाश, अस्वस्थता, नकारात्मक विचारांमुळे मानसिक खळबळ हाेत राहील.ज्यांना पूर्वीपासूनच अपचन, मधुमेह, स्थूलता, पाठीच्या खालील भागात वेदना असतील त्यांनी या काळात जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
 
शुभदिनांक : 18, 19, 23
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात तुमच्या श्रमाचे सार्थक हाेईल. तुमचा मत्सर करणाऱ्यांवर न रागावता त्यांच्यावर बहिष्कार टाका.
 
उपाय : या आठवड्यात करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आदित्य हृदय स्ताेत्र राेज वाचा. निळ्या फुलांनी सरस्वतीमातेची आराधना करा.