तुमच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार उठतील. तुम्ही त्या विचारांत हरवलेले राहाल. तुम्हाला बाैद्धिक कामात सहभागी व्हावे लागेल पण वादविवाद करणे टाळावे. तुम्ही खूपच भावुक राहणार आहात. विशेषत: आई व पत्नीविषयी जास्त भावुक राहाल. प्रवासाचे याेग असूनही शक्यताे प्रवास टाळावा.
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा नाेकरी-व्यवसायात पुढे जाण्यासाठी एक उत्तम काळ आहे. विशेषकरून तुम्हाला एखादी नवी संधी मिळाल्यामुळे प्रगतीच्या नव्या वाटा माेकळ्या हाेतील. जर तुम्ही कामात व्यावसायिक दृष्टिकाेन ठेवाल तर त्यामुळे ायद्यात राहाल. भागीदारीच्या कामात तुम्ही पुढे जाऊ शकाल.
नातीगाेती : हा आठवडा प्रेमसंबंधासाठी उत्तम काळ घेऊन आला आहे.विेशेषकरून सुरुवातीला तुम्ही तुमचे प्रेम चांगल्याप्रकारे व्यक्त करू शकाल. पण तुमच्या शैलीत जास्त आततायीपणा वा आक्रमकता दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा तुमची घाई तुमच्या पार्टनरच्या नापसंतीचे कारण ठरू शकते.दांपतत्यजीवनात स्थिरता येईल व नात्यात दबदबा वाढेल.
आराेग्य : या आठवड्यात तुमच्या चेहऱ्यावर तेज वाढेल. ज्या लाेकांना खाेकला-पडसे असेल त्यांनी आठवड्याच्या अखेरच्या काळात थाेडी काळजी घ्यायला हवी. लहान वयाच्या जातकांमध्ये खूप उत्साह असल्यामुळे विशेषत: स्पाेर्ट्समध्ये उत्तम प्रदर्शन राहील. तरीही आठवड्याच्या मध्यात जपावे व समस्या उद्भवल्यास उपचारात बेपर्वाई करू नये.
शुभदिनांक : 20, 21,24
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात स्वत:साठी उत्तम शेड्यूल तयार करून भविष्यातील कामांसाठी ऊर्जा साठवावी.
उपाय : या आठवड्यात गुरुवारी हळकुंड, हरभराडाळ व गूळ केळीच्या झाडाखाली समर्पित करा.