कमी झाेप मुलांना रागीट बनवत आहे...

    20-Jul-2021
Total Views |

15 ते 17 वर्षांच्या 34 निराेगी मुलांच्या वागणुकीच्या अभ्यासातून निघालेला निष्कर्ष 
 
 
Child_1  H x W:
 
आरामदायक झाेप काेणाला नकाे असते? परंतु धावपळीचे आयुष्य, कामाचे ओझे इ. अनेक कारणांनी लाेकांना सध्या पुरेशी झाेप घेणे अवघड झाले आहे. काेराेनामुळे ही समस्या जास्तच वाढली आहे. झाेप कमी झाली तर शरीरावर अनेक प्रकारचे विपरीत परिणाम हाेतात. आता एका ताज्या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे की, अपुरी झाेप मुलांना रागीट बनवित आहे.ऑस्ट्रेलियाच्या फ्लींडर्स विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले व काढलेल्या निष्कर्षात असे नमूद केले आहे की, धावपळीचे आयुष्य, महामारीचा ताण आणि रात्री उशिरापर्यंत काॅम्प्युटर, लॅपटाॅपवर काम करावे लागत असल्याने मुलांना फार कमी झाेप घ्यावी लागत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे दिवसभरात ऊर्जा आणि कामाचे नुकसान हाेऊ शकते. यासाेबतच त्यांचा स्वभाव रागीट बनून वैफल्य निर्माण हाेऊ शकते.
 
असे केले अध्ययन - या अध्ययनात शास्त्रज्ञांनी 15 ते 17 वर्षांच्या 34 निराेगी मुलांना समाविष्ट करून त्यांच्या झाेपेचे पॅटर्न (पद्धत)वर लक्ष ठेवण्यासाठी या सहभागी मुलांना विशेष प्रकारे तयार केलेल्या ‘स्लिप सेंटर’ मध्ये 10 दिवस आणि 10 रात्र मुक्काम करण्यास सांगितले. यानंतर सहभागींना सतत 5 रात्री तीन अवधीच्या झाेपेपैकी एका पॅटर्नची झाेप निवडण्यास सांगितले. त्यात 5 तास, साडेसात तास किंवा एक रात्र बिछान्यावर  10 तास झाेपण्याचा समावेश हाेता.तीन गटात विभागणी - यानंतर शास्त्रज्ञांनी 10 दिवसानंतर सहभागी मुलांच्या वागणुकीत झालेल्या बदलाचे विश्लेषण केले त्यात असे आढळून आले की, ज्या गटाने 5 तास झाेप घेतली. दुसऱ्या गटाने साडेसात तास झाेप घेतली. 10 तास झाेप घेणाऱ्या गटाच्या तुलनेत जास्त उदासी, राग आणि भ्रमित झाल्यासारखी लक्षणे दिसली. संशाेधक म्हणाले की, 5 तास झाेप घेणाऱ्या मुलांना अपुरी झाेप झाल्यामुळे आनंद आणि ऊर्जा खूपच कमी झाली.
 
मूड जाणून घेण्यासाठी एका ध्रृवीय दृष्य अ‍ॅनालाॅग स्केलचा वापर करण्यात आला.10 दिवस स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांच्या झाेपेचे निरीक्षण करण्यात आले.05 तास झाेप घेणाऱ्या मुलांमध्ये राग, चिंता जास्त आढळून आली.· फ्लींडर्स विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केले अध्ययन · ‘स्लीप’ जर्नलमध्ये या अध्ययनाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले.· डिप्रेशन आणि काळजीची पातळी वाढण्यासाठी जबाबदार प्रमुख संशाेधक डाॅ. मिशेल शाॅर्ट यांनी सांगितले की, स्पर्धकांमध्ये उदासी, भीती, क्राेध, भ्रम, काळजी, आनंद यासारख्या भावनांच्या प्रतिक्रियांचे अवलाेकन करण्यासाठी मुले झाेपेतून उठल्यानंतर दर तीन तासांनी त्यांचा मूड तपासण्यात आला. अपुऱ्या झाेपेची व्यापकता आणि किशाेरांची मनस्थिती याबाबत विकार आणि विकृतीच्या वाढत्या घटना पाहता हा धाेका कमी करण्यासाठी पुरेशी झाेप किती महत्त्वाची आहे, हे सिद्ध हाेत