मेष

    20-Jul-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
हा आठवडा आर्थिक व व्यावसायिक दृष्टीने लाभदायक ठरणारा राहील.धनलाभासाेबत तुम्ही दीर्घकाळासाठी धनाचे नियाेजनही करू शकाल. मित्र व स्वजनांसाेबत मजेत वेळ घालवाल. छाेटे प्रवासही हाेऊ शकतात. आपण एखादे पुण्याचे काम कराल. तुमच्या जीवनात हा काळ खूप आनंददायी असेल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक माेर्चावर तसेच बाेलण्यात, सभेत बाेलण्यात परखडपणा ठेवावा लागेल. तुम्ही तुमच्या जिद्द व परिश्रमाच्या बळावर कठाेर स्पर्धेतही टिकून राहून प्रगती करू शकाल. भागीदारीच्या कामात घाई करू नये. नाेकरदार आपल्या हुशारीच्या बळावर बढतीचे मार्ग प्रशस्त करू शकतात. सध्या नवी सुरुवात करण्यास तुम्ही उत्सुक असाल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधाबाबत बाेलायचे तर सध्या जास्त तणाव घेण्याची गरज नाही कारण बहुतेक काळ आपल्यात घनिष्टता राहणार आहे.पण ज्यामुळे जाेडीदाराला राग येईल अशी परिस्थिती उत्पन्न हाेऊ देऊ नका.
विशेषत: आठवड्याच्या मध्यात तुमच्या मनात राेमँटिक विचार जास्त राहतील.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील. त्यामुळे सर्व कामे उत्साहाने कराल. तसेच दैनंदिन जीवनातही तरतरीत राहाल. याशिवायत दैनिक कामातून थाेडा मानसिक व शारीरिक ब्रेक घेऊन आप्तेष्टांसाेबत एखाद्या छाेट्या प्रवासाचे आयाेजन करण्याची शक्यता आहे. सुरुवातीला थाेडे अडथळे येऊन तुमची ही मनाेकामना पूर्ण हाेईल..
 
शुभदिनांक : 18, 19, 23
 
शुभरंग : पिवळा, लाल, शुभ्र
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात खाण्या-पिण्याकडे जरा जास्त लक्ष देऊन समताेल आहाराचा मंत्र आत्मसात करावा.
 
उपाय : या आठवड्यात हनुमंताला विड्याच्या पानावर गूळ व ुटाणे ठेवून नैवेद्य दाखवावा. मंगळवारी व शनिवारी सुंदरकांड वाचाव