कुंभ

    20-Jul-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातील एखाद्या सहकर्मचाऱ्याची खास मदत कराल.तुम्हाला तुमच्या कामाबद्दल तुमच्या उच्च अधिकाऱ्यांकडून शाबासकी मिळेल.तसेच सामाजिक मान-सन्मान लाभेल. सहकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य लाभेल.
व्यापारात धनप्राप्तीचे उत्तम याेग राहतील. कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण राहील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात शेअर बाजार, व्याज, कमिशन आधारित कामांमध्ये विशेष फायदा हाेण्याची शक्यता आहे. जर दीर्घकाळापासून उधारीत धन अडकले असेल तर ते या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थीवर्गाला सध्या अभ्यासाची चिंता जास्त राहील.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे प्रियपात्रासाेबत असलेले संबंध अनुकूल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वागण्या-बाेलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. लहानसहान गाेष्टी वा गैरसमजामुळे नात्यांमध्ये काेणत्याही प्रकारचा तणाव उत्पन्न हाेऊ देऊ नका. प्रियपात्रासाेबत फिरायला जा.
 
आराेग्य : तुम्हाला तब्येतीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. भाैतिक सुख व धन मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेबाहेर जाऊन प्रयत्न कराल, ज्याचा परिणाम तुमच्या तब्बेतीवर हाेईल. याेग व प्राणायाम करा. पुरेशी विश्रांती घ्या.
 
शुभदिनांक : 20, 21, 24
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : संपत्तीबाबत काही मुद्दे डाेके वर काढू शकतात. जे तुमच्यासाठी त्रास उत्पन्न करतील. तुमच्या शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे.
 
उपाय : या आठवड्यात घरातील अन्नाचा काही भाग कुत्र्यालाही द्यायला हवा.कारण ते भैरवाचे गण मानले जातात. त्यांना दिलेले जेवण तुमचे राेग, दारिद्रय कमी करतात. देवीला शुभ्रमिठाई अर्पण करा