आयटीआयच्या 10 हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जाॅब ट्रेनिंग

    19-Jul-2021
Total Views |
 
मलिक यांची माहिती : सिमेन्स व टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्हज ट्रस्टमध्ये सामंजस्य करार
 

IIT_1  H x W: 0 
 
 
राज्यातील दहा जिल्ह्यांतील 126 शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थांत (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10 हजार प्रशिक्षणार्थींना ऑन जाॅब ट्रेनिंग उपलब्ध हाेणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या माॅडेलअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असून, यासाठी काैशल्य विकास, राेजगार आणि उद्याेजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि सिमेन्स लिमिटेड व टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्हज ट्रस्टमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि राेजगार उपलब्ध हाेईल. त्यामुळे हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे मलिक यांनी सांगितले.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात जागतिक युवा काैशल्य दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात हा सामंजस्य करार करण्यात आला.
 
या वेळी काैशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, काैशल्य विकास आयु्नत दीपेंद्रसिंह कुशवाह, काैशल्य विकास मंडळाचे अध्यक्ष डाॅ. अनिल जाधव, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक याेगेश पाटील, सिमेन्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मनमाेहनसिंग काेरंगा, अनिस माेहंमद, टाटा स्ट्राइव्हचे अभिषेक धाेत्रे यांच्यासह ऑनलाइन पद्धतीने राज्यातील आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित हाेते.औरंगाबाद, काेल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड व ठाणे या 10 जिल्ह्यांतील 126 शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्राॅनिक मेकॅनिक, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर, टूल आणि डायमेकर, माेटार मेकॅनिक व्हेईकल, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग, तसेच वेल्डर या व्यवसाय अभ्यासक्रमांत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या आयटीआयना नजीकच्या उद्याेगांशी जाेडून त्याद्वारे त्या उद्याेगांत उमेदवारांना ऑन जाॅब ट्रेनिंग उपलब्ध करून देण्यात येईल.
 
आयटीआयमधील प्रथम वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याचे ऑन जाॅब ट्रेनिंग, द्वितीय वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दाेन महिन्यांचे, तर आयटीआयचा अंतिम निकाल घाेषित झाल्यानंतर एक वर्षासाठी अ‍ॅप्रेंटीशिपची संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बांधकाम यंत्रसामग्री आणि उद्वाहन (इलेव्हेटर्स) निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी थिसेनकृप इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसमवेतही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचा सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीद्वारे त्यांच्याकडील सीएसआर फंडामधून 1 काेटी 80 लाख रुपये निधीतून औंध (जि.पुणे) येथील आयटीआयमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित वेल्डिंग वर्कशाॅप उभारण्यात येईल. यासाठी थिसेनकृप इंडस्ट्रीजचे मुख्य वित्त अधिकारी पुलकीत गाेयल आणि सुनील सगणे यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांच्यासमवेत सामंजस्य कराराचे आदान-प्रदान केले.