व्यायामात दुखापत टाळण्यासाठी टिप्स

19 Jul 2021 14:05:09
 
 

Exercise_1  H x 
 
दुखापत हाेणं, मुरगळणं, पडणं अशांसारख्या प्रसंगातून वाचण्यासाठी व्यायाम करते वेळी याेग्य ताे पाेशाख घालावा. बूट देखील आरामदायक असावेत. काेणत्याही अत्याधुनिक उपकरणाच्या साह्यानं व्यायाम करत असाल तर त्याचा दर्जा तपासून खात्री करून घ्या.व्यायामाची सुरुवात तडक फडक करू नका. एका वेळी फार वेळ व्यायाम करू नका. ‘वाॅर्म अप’ केल्यानंतर शेवटी ‘कूल डाऊन’ करणं गरजेचं आहे.व्यायामाचा वेळ सुरुवातीला कमी ठेवा. हळूहळू हा वेळ वाढवत न्या.म्हणजे स्नायूंवर एकदम जाेर पडणार नाही. व्यायाम करताना अति उत्साहाला आवर घाला, त्यामुळे नुकसान हाेण्याची शक्यता असते.
Powered By Sangraha 9.0