कशी मिळवाल सफलता?

    17-Jul-2021
Total Views |

success_1  H x  
 
 
सफलता मिळवण्यासाठी चिंतन अतिशय महत्वाचे आहे. नकारात्मक चिंतन स्वतः ची उपेक्षा करते. स्वतःला श्रेष्ठ समजा.समाेरच्याची श्नती माेजा आणि दृढ प्रतिज्ञा करा श्रेष्ठ बनण्याची.चिंतनानंतर सफलतेसाठी आवश्यक आहे. कर्म, कर्म धैर्याने व मन लावून करावे. कर्मच पूजा आहे. या सिद्धांताचा अंमल केल्याने सफलता निश्चित प्राप्त हाेते.कर्म आणि चिंतनानंतर हे समजावून घ्यावे की कर्म कसे केले जाते. काेणतेही कार्य लहान समजू नये व जे कराल ते व्यवस्थित करावे. मानसिक श्रेष्ठतेसाठी अध्ययन अत्यंत आवश्यक आहे. नेहमी नवनवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. रिव्हीजन खूप आवश्यक आहे. नवीन शिकण्यासाठी नेहमी तत्पर असावे. काेणतेही कार्य करण्यासाठी शारीरिक सामर्थ्य आवश्यक आहे. राेज लवकर झाेपा व सकाळी लवकर उठा. राेज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम अतिआवश्यक आहे.स्वप्न पहायला शिका, कल्पना हीच शाेधांची जननी असते. आता उशीर कशाला करता, आपली क्षमता तपासा आणि रस्ता पकडा. एक दिवस तुम्हाला तुमचे ध्येय जरूर मिळेल.