उंदराचा जुळा भाऊ

    17-Jul-2021
Total Views |

rat_1  H x W: 0
उंदरा सारखा दिसणारा मऊ मऊ केसांचा गिनी पिग परदेशात पाळीव प्राणी म्हणून पाळला जाताे. गिनी पिग हा प्राणी मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे.त्याच्या सर्व शरीरावर लांब आणि मऊ केस असतात. त्यांचे डाेके माेठे, कान लहान आणि पाय आखूड असतात. त्यांना पिंजर्यात ठेवले जाते. त्यांचे मुख्य खाद्य गवत आहे. ते सफरचंद, पानकाेबी, फुलकाेबी, गाजर देखील खातात.
मालक आल्यावर ते छानशी शिट्टी वाजवतात.माणसांप्रमाणेच संसर्गजन्य राेग त्यांनाही हाेतात म्हणून त्यामुळे शास्त्रीय संशाेधनात त्यांचा माेठ्या प्रमाणात वापर साेळाव्या शतकापासून केला जात आहे.रशिया आणि चीन या देशांनी त्यांचा अंतराळयानांत संशाेधनासाठी वापर केला आहे.