पुणे जिल्हा पाेलिस पाटील संघातर्फे मुख्यमंत्री निधीस मदत

17 Jul 2021 14:45:46
13 लाख32 हजारांचा धनादेश अजित पवार यांच्याकडे सुपूद

fund_1  H x W:
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी (काेविड-19) राज्य गावकामगार पाेलिस पाटील संघाशी संलग्न असणाऱ्या पुणे जिल्हा गावकामगार पाेलिस पाटील संघटनेतर्फे 13 लाख 32 हजारांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केला. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित हाेते.मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात संघटनेच्या वतीने हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र गावकामगार पाेलिस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा काळभाेर, पुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे, राज्य संघटक नवनाथ धुमाळ, चिंतामण माेरे, हनुमंत हंडाळ, अरुण पाटील-बाेडके, संपतराव जाधव, साेमनाथ मुळाणे, नीलकंठ थाेरात, दिनेश पाटील, तृप्ती मांडेकर, राेहिणी हांडे, माेनिका कचरे, प्रविणा शेडगे आदी मान्यवर उपस्थित हाेते. राज्यातील सर्व पाेलिस पाटलांनी काेविड काळात गावपातळीवर दिलेल्या याेगदानाचे पवार यांनी काैतुक केले.
Powered By Sangraha 9.0