नाशिकचे वनाधिकारी आनंद रेड्डी यांची ‘गाेफण समर्पण माेहीम’

    17-Jul-2021
Total Views |

Gofan_1  H x W:
 
गाेफण हे शेतकऱ्यांसाठी पिकांचे संरक्षण करणारे साधन आहे. पण, गंमत म्हणून मुले गाेफणीमध्ये दगड ठेवून पक्ष्यांच्या दिशेने भिरकावतात व त्यामुळे बऱ्याच वेळा पक्ष्यांचा मृत्यू हाेताे; पण पर्यावरणाचेही नुकसान हाेते.यामुळे नाशिकचे नवनियु्नत वनाधिकारी आनंद रेड्डी यांनी देशातच नव्हे तर जगात सर्वप्रथम ‘गाेफण समर्पण माेहीम’ सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यात आनंद रेड्डी यांची ‘गाेफण समर्पण माेहिमे’चे जनक अशी ओळख बनली आहे.आनंद रेड्डी यांच्या गाेफण समर्पण माेहिमेमुळे पक्ष्यांच्या किलबिलाटाविना सुना आणि शांत बनलेल्या जंगलांमध्ये पक्ष्यांची किलबिल पुन्हा सुरू झाली आहे. 2018 बॅचचे आयएफएस अधिकारी रेड्डी यांची पहिलीच पाेस्टिंग जून 2018 मध्ये नाशिक येथे झाली. वन अधिकारी असल्यामुळे जंगलात फिरणे ही त्यांची ड्युटीच आहे, पण पक्ष्यांची किलबिल ऐकू येत नसल्याचे पाहून त्यांच्या मनाची चलबिचल झाली व त्यांनी बारकाईने लक्ष ठेवले असता काही मुले हातात गाेफण घेऊन फिरताना त्यांनी पाहिली.
 
शेतकरी दाणे भरत आलेल्या पिकांवर बसलेल्या पक्ष्यांना उडविण्यासाठी नुसती गाेफण फिरवितात, पण गाेफणीचा ‘खेळ’ खेळणारी मुले गाेफणीमध्ये माेठा दगड ठेवून पक्ष्यांच्या दिशेने भिरकावतात. त्यामुळे पक्षी गंभीर जखमी हाेऊन मरण पावतात. यामुळे रेड्डी यांनी ‘गाेफण समर्पण माेहीम’ सुरू केली. 18 महिन्यांच्या अविरत प्रयत्नांनंतर याचे परिणाम दिसू लागले. या कालावधीत 70 मुलांनी गाेफणीचा त्याग करून गाेफणी रेड्डी यांच्या स्वाधीन केल्या. यानंतर निरनिराळ्या गावांमधील 600 पेक्षा जास्त मुलांनी त्यांची गाेफण स्थानिक वन कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केल्या. यासाठी मुलांना दटावण्याची किंवा शिक्षा करण्याची गरज नसून, मुलांची समजूत घातली तरी ते समजतात, असा रेड्डी यांचा अनुभव आहे.ही मुले काहीही कारण नसताना गाेफणीमध्ये दगड ठेवून झाडावर बसलेल्या पक्ष्यांच्या दिशेने भिरकावत असल्याचे दिसले. यामुळेच नाशिक जिल्ह्याच्या गावागावात पक्ष्यांची संख्या कमी झाली असावी, असा विचार रेड्डी यांनी केला व मुलांना गाेफण खेळापासून परावृत्त करण्याचा निश्चय केला.