भरतीप्रक्रिया राज्यात लवकरच

    17-Jul-2021
Total Views |
 
सामान्य प्रशासन राज्यमंत्री भरणे यांनी दिली माहिती
 


Dattatray bharane_1  
 
सार्वजनिक आराेग्य, वैद्यकीय शिक्षण आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधांतून सूट देण्यात आली असून, गट अ ते क पर्यंतची एकूण 15511 पदे महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत (एमपीएससी) भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
 
त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आराेग्य, वैद्यकीय शिक्षण आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. तसेच, गट अ ची 4417 पदे, गट ब ची 8031 पदे आणि गट कची 3063, अशी एकूण 15511 पदे भरण्यास वित्त विभागाने 2018 पासून मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असे भरणे यांनी सांगितले.केंद्रीय लाेकसेवा आयाेगाकडून (यूपीएससी) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहितीही भरणे यांनी दिली.