डाेहाळे लागणे म्हणजे काय?

    16-Jul-2021
Total Views |
 
 
 

pregnanacy_1  H 
गर्भधारणेच्या दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात गर्भवतीला वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा हाेते. अनेकदा गर्भवती महिलांना आंबट, गाेड, चटपटीत, चाॅकलेट, एखादा विशिष्ट पदार्थ किंवा मिठाई खाण्याची इच्छा हाेते. या इच्छेला सामान्यतः डाेहाळे असं म्हणतात.याची तीव्रता एवढी असते की, ताे पदार्थ खाल्ल्याशिवाय मनाला शांतता मिळत नाही, पण अनेकदा असे पदार्थ खावेसे वाटतात, जे आराेग्यासाठी चांगले नसतात.गर्भधारणेनंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे रासायनिक बदल हाेतात.
 
ज्यांना वैद्यकीय भाषेत हार्माेनल बदल असं म्हणतात. शरीरात हाेणाऱ्या हार्माेनल बदलांमुळे महिलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्याची इच्छा हाेते. डाेहाळ्यांचं दुसरं कारण असं की, शरीरात ज्या घटकांची कमतरता आहे, तेच खाण्याची तीव्र इच्छा डाेहाळ्याच्या माध्यमातून हाेते. यामुळे वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा हाेते.जर तुम्हाला माती, खडू यांसारखं काही खावंसं वाटत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्या.डाॅक्टर तुम्हाला सप्लीमेंटस देतील. जेणेकरून आवश्यक घटकांची पूर्ती हाेईल आणि डाेहाळ्यांवर नियंत्रण मिळवता येईल.