राज्यातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना इस्राईलमध्ये शिकण्याची संधी

    16-Jul-2021
Total Views |
 
 
 
israel_1  H x W
 
राज्यातील विविध विद्यापीठांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इस्त्राईलमधील विविध संस्थांत प्रायाेगिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध हाेणार आहे. राज्यपाल भगतसिंह काेश्यारी, इस्राईलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकाेव्ह फिन्केलस्टीन व इस्राईलच्या पर्यटन मंत्रालयाचे प्रतिनिधी सॅमी यहाई यांच्या उपस्थितीत सहकार्य याेजनेचा प्रारंभ राजभवनात करण्यात आला.इस्राईलचे पर्यटन मंत्रालय व इस्काॅनशी निगडित गाेवर्धन इकाे व्हिलेज या संस्थेमार्फत ही याेजना राबवण्यात येणार आहे. या याेजनेत राज्यातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना दहा दिवस इस्राईलमधील शिक्षण, उद्याेगजगत, स्टार्ट अप आदी संस्थांना भेट देऊन तेथील कार्यसंस्कृतीचा अभ्यास करता येणार आहे.इस्रायली विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारे भारत भेटीवर येता येणार आहे. या वेळी गाेवर्धन इकाे व्हिलेजचे संचालक गाैरंग दास, गाेवर्धन इकाे व्हिलेजच्या सामाजिक दायित्व विभागाचे प्रमुख याचनीत पुष्कर्ण, तसेच काेकण प्रांत संघचालक डाॅ.
सतीश माेध उपस्थित हाेते.