कुटुंबातील मृतांची स्मृती जपण्यासाठी अवशेषापासून बनविले दागिने

    16-Jul-2021
Total Views |
 
ऑस्ट्रेलियातील 29 वर्षांच्या जॅकी विलियम्सच्या व्यवसायास प्रतिसाद
 

bone_1  H x W:  
 
आपल्या प्रियव्यक्तीच्या मृत्यूनंतर स्मृती जपण्यासाठी घरात त्याव्यक्तीचा फाेटाे भिंतीवर लावतात व राेज पुष्पहार घालतात, तर काही लाेक मृतव्यक्तीची समाधी बांधून स्मृती जपण्याचा प्रयत्न करतात, पण ऑस्ट्रेलियामध्ये लाेक मृतव्यक्तीचे दात आणि हाडापासून च्नक दागिने बनवून घेऊन वापरतात व हे दागिने बनविण्याचे काम ग्रेव्ह मेटलम ज्वेलरी शाॅपची 29 वर्षांची मालकीण जॅकी विलियम्स करते.जॅकी विलियम्स मृतव्यक्तीच्या दात व हाडांपासून नेकलेस, बाजूबंद, अंगठी इ. दागिने तयार करून देते व या अफलातून कारागिरीतून तिला ग्राहकांकडून प्रत्येकी 20 हजार रुपयांपासून 5 लाख रु.मिळतात. तिला अशा प्रकारचे दागिने तयार करण्यास 6 ते 8 आठवडे लागतात.एका ग्राहकाच्या आजाेबाने स्वतःवर गाेळी झाडून आत्महत्या केली. ज्या गाेळीने आजाेबाचा मृत्यू झाला ती गाेळी वापरून त्याने अंगठी तयार करून घेतल्याचे जॅकी विलियम्सने सांगितले.