दाढी आजारापासून वाचविते; संशाेधनाचा निष्कर्ष

    16-Jul-2021
Total Views |
 
 

Beard_1  H x W: 
 
गेल्या काही वर्षांपासून तरुणांना दाढी ठेवण्याची आवड निर्माण झाली आहे; पण काेराेना काळात सतत लाॅकडाऊन लागू हाेत असल्यामुळे हेअर कटिंग सलून बंद राहत असत. त्यामुळे गेल्या दीड वर्षात दाढी आवडत नसलेले लाेकसुद्धा नाइलाजाने दाढी ठेवू लागले. दाढी ठेवण्याची परंपरा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. आता नव्या संशाेधनातून दाढी आजारापासून वाचविते, असे निष्पन्न झाले आहे.काेराेनामुळे दाढीला नवे जीवन मिळाले असे म्हणता येईल. दाढीमुळे व्य्नितमत्त्व प्रभावी बनते. ‘जर्नल ऑफ हाॅस्पिटल इन्फे्नशन’मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दाढी ठेवणाऱ्या लाेकांचे अतिशय खतरनाक समजल्या जाणाऱ्या एमआरएसए नावाच्या बॅ्नटेरियापासून संरक्षण हाेते.एमआरएसए म्हणजे मेथेसिलिन रेझिस्टंस स्टेफेलाे फाेकस ऑरियस. यावर काेणतेही औषध नाही, पण ते बॅ्नटेरियाविराेधी आहे. ते हाॅस्पिटलच्या वातावरणात आढळून येते.
 
बाेस्टन येथील वूमेन्स हाॅस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 408 पुरुषांवर एक प्रयाेग करण्यात आला. त्यात काही दाढी ठेवणारे, तर काही दाढी न ठेवणारे हाेते.या लाेकांचे अध्ययन केले असता असे आढळून आले की, दाढी ठेवणारे लाेक दाढी न ठेवणाऱ्या लाेकांच्या तुलनेत आजारापासून जास्त सुरक्षित हाेते.दाढी ठेवणाऱ्या लाेकांना आजाराचा धाेका कमी असताे.पुरुषांची त्वचा थाेडी कडक आणि काेरडी असते. त्यामुळे बरेच लाेक त्वचा मऊ करण्यासाठी फेस क्रीमचा वापर करतात, पण यामुळे त्वचेचे नुकसान हाेऊ शकते. दाढी ठेवणाऱ्या लाेकांना दमाअ‍ॅलर्जीचा धाेका नसताे. दाढी ठेवली, तर चेहऱ्याचा धूळ आणि प्रदूषणापासून बचाव हाेताे. दाढी एकप्रकारे चेहऱ्याची फिल्टर असते. जे लाेक दाढी मिश्या ठेवतात त्यांचे वय जास्त वाटत नाही. कारण त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दिसत नाहीत.