लाॅकडाऊनमध्ये घरी लिंबू असावेच

15 Jul 2021 18:04:33
 
 

lemon_1  H x W: 
 
लिंबाचे अनेक औषधी उपयाेग आहेत. लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चाेखल्यास ओकारी थांबते.पाेटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा.अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चाेखावे.त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पाेटफुगी वगैरे त्रास कमी हाेताे.पित्त झाले असल्यास राेज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शाैचास साफ हाेते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही राेज लिंबाचा रस काेमट पाण्यात घालून घेतल्याने उपयाेत हाेताे.वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत हाेते.
Powered By Sangraha 9.0