घाेस्ट बस्टर्स चित्रपटातील कार आता आहे शववाहिनी

15 Jul 2021 17:56:09

shavvahini_1  H
 
स्मशानात चितेवर प्रेत जळत असताना या मृत व्य्नतीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लाेकांना वाटते की, ‘हे जग असार आहे.
नाशिवंत आहे. पण हा विचार फ्नत स्मशानातून बाहेर पडेपर्यंत टिकताे. म्हणून अशा विचारांना स्मशानवैराग्य असे म्हणतात. अशीच कहाणी एका ‘कार’ची आहे.सन 1984 मध्ये प्रथमच सुपर नॅचरल काॅमेडी चित्रपट ‘घाेस्टबस्टर्स’ प्रदर्शित झाला हा. चित्रपट खूपच गाजला. 57 वर्षांच्या पाॅल नावाच्या इसमाला हा चित्रपट इतका आवडला, की पाॅलने ताे राहत असलेल्या मध्य इंग्लंडमधील वेस्ट मिडलँड काऊन्टीच्या चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला. त्याला हा चित्रपट इतका आवडला की, नंतर त्याने हा चित्रपट त्या नाॅव्हेल्टी चित्रपटगृहात दाेन आठवडे दरराेज पाहिला. नंतर याच ‘घाेस्ट बस्टर्स’ चित्रपटावर आधारित टी.व्ही. मालिका आता प्रसारित हाेत आहे. ही मालिका पाहत असताना पाॅलच्या मनात एक वेगळाच विचार आला. हा विचार म्हणजे विवाह साेहळा ते शववाहिनी कार असा आहे.
 
पाॅलने एक जुनी कार खरेदी केली व या कारला घाेस्ट बस्टर्स चित्रपटातील कारसारखी हुबेहूब दिसावी तशी या कारची सजावट केली.यासाठी त्याने दाेन वर्षांत तब्बल 50,000 पाैंड खर्च केले. व घाेस्ट बस्टर्स चित्रपटातील कार सारखीच हुबेहूब कार तयार केली.
ही कार सजविण्यासाठी खर्च केलेली 50,000 पाैंडाची र्नकम वसूल करण्यासाठी पाॅलने ही कार विवाह, पार्टी इ. साठी भाड्याने देण्यास सुरुवात केली. या कारमध्ये काॅस्ट्युम्स, म्युझिक आणि लाइटिंगची व्यवस्था आहे. आता ही कार फ्नत अंत्ययात्रेत शववाहिनी म्हणून वापरण्यात येत आहे. ही कार शववाहिनी कां बनविली? या प्रश्नाचे उत्तर देताना पाॅल हरबर्नने असा खुलासा केला आहे की, एक दिवस अचानक एका इसमाचा फाेन आला की, आम्हाला तुमची कार अंत्यविधीसाठी द्याल का? या कारच्या मागच्या भागात शवपेटी (काॅफीन) ठेवणे श्नय हाेते. विशेष म्हणजे ज्या इसमाने हा फाेन केला हाेता.ताे सुद्धा घाेस्ट बस्टर्स चित्रपटाचा प्रशंसक हाेता. आता ही कार फ्नत अंत्ययात्रा, अंत्यविधीसाठीच वापरण्यात येते.
Powered By Sangraha 9.0