मराठी भाषा भवन उपकेंद्रासाठी नवी मुंबईतील ऐराेलीत भूखंड

    15-Jul-2021
Total Views |
 
 
सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सिडकाेकडून राज्य शासनाकडे हस्तांतरित

sidko_1  H x W:
 
सिडकाेकडून मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या उभारणीसाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाला देण्यात आलेल्या नवी मुंबईतील ऐराेलीतील भूखंडाचे मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत व सिडकाेचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डाॅ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकाेच्या अधिकाऱ्यांतर्फे हस्तांतर करण्यात आले.यावेळी देसाई यांनी या भूखंडाची पाहणी केली.याप्रसंगी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, सिडकाेचे सह व्यवस् तापकीय संचालक एस. एस. पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा सिडकाेचे महाव्यवस्थापक (वसाहत) अनिल पवार, सिडकाेच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, साहाय्यक भूमापन अधिकारी बी. डी. राठाेड यांच्यासह सिडकाेचे अन्य अधिकारी उपस्थित हाेते. मराठी भाषा भवन उपकेंद्राची इमारत बहुउद्देशीय सामायिक सुविधांनी युक्त असेल.
 
या इमारतीत ग्रंथालय, बैठकांसाठी बहुउद्देशीय सभागृहासह भाषाविषयक विविध उपक्रमांची कार्यालये व अध्यक्षांसाठी स्वतंत्र दालनांची व्यवस्था असेल, अशी माहिती देसाई यांनी दिली.भाषा संचालनालय, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विश्वकाेश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था, या संस्थांची कार्यालये मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणून त्यात एकसूत्रता निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने 2016 मध्ये सिडकाेकडे भूखंडाबाबत विचारणा केली हाेती. त्यानुसार सिडकाेने ऐराेलीतील सेक्टर-13 मधील भूखंड क्र. 6 अ हा अंदाजे 3000 चाै.मी.चा भूखंड मराठी भाषा भवन उपकेंद्रासाठी निश्चित करून, दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने या भूखंडाचा ताबा राज्य शासनाला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इमारतीच्या उभारणीची जबाबदारी शासनातर्फे महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) देण्यात आली आहे, अशी माहितीही देसाई यांनी दिली.