उद्याेगांसाठीही राज्यात काेराेना टास्क फाेर्स नेमावा

    14-Jul-2021
Total Views |
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना : सीआयआयच्या प्रतिनिधींशी साधला संवाद

Task Force_1  H 
 
 
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्याेगक्षेत्रासाठीही काेराेनाविषयक टास्क फाेर्स स्थापन करावा.त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. काेराेना काळातही उद्याेगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनात अडथळे येऊ नयेत, या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन व साठ्याचे नियाेजन, तसेच उद्याेगांतील कामगारकर्मचाऱ्यांचे माेठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम हाेऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, काेराेना हाेऊ न देणारी व्यवस्था (बायाे बबल) यावर मुख्यमंत्र्यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.
 
यावेळी उद्याेगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त मुख्य सचिव आराेग्य डाॅ. प्रदीप व्यास आदी उपस्थित हाेते. या ऑनलाइन बैठकीत सीआयआयचे पदाधिकारी उदय काेटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गाेयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गाेयंका, बाबा कल्याणी, बी. त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेसवाणी, अश्विन यार्दी, राशेष शहा, केशव मुरुगेश, भारत पुरी, असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नाैशाद फाेर्बस, डी. के. सेन, सुलज्जा फिराेदिया माेटवाणी, शरद महिंद्रा आदी उद्याेगपती सहभागी झाले हाेते.उद्याेगांच्या प्रतिनिधींनी काेराेनाच्या साथीत राज्य शासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे, तसेच उद्याेगांच्या परिसरात काेराेना सुसंगत वर्तणूक राहील, याची काळजी घेण्याची खात्री दिली. कुंटे यांनीही यासंदर्भात उद्याेगांशी समन्वय ठेवण्यात येत असल्याचे सांगितले.