आगपेटीच्या काड्यांपासून रथ

14 Jul 2021 18:25:28

rath_1  H x W:
 
ओडिशा राज्यातील जगन्नाथपुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रा जगभर प्रसिद्ध आहे. याप्रसंगी भगवान बलराम त्यांचे धाकटे बंधू श्रीकृष्ण आणि त्यांची बहीण सुभद्राच्या मूर्तीची रथातून अतिभव्य मिरवणूक काढण्यात येते.सध्या पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेची जाेरदार तयारी सुरू आहे. रथयात्रेचे औचित्य साधून एल. ईश्वर राव नावाच्या कलाकाराने आगपेटीच्या 435 काड्या वापरून भगवान जगन्नाथाचा सुंदर रथ तयार केला आहे.या रथातील बलराम, श्रीकृष्ण आणि सुभद्राची मूर्ती कडूनिंबाच्या लाकडापासून तयार केल्या आहेत.रथाच्या वरच्या भागाला केशरी, पांढरा आणि हिरवा रंग देण्यात आला आहे.हा रथ एल. ईश्वर राव यांनी 9 दिवसांत तयार केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0